वैनगंगेत बुडून तरूणासह तिघांचा मृत्यू
By admin | Published: June 26, 2016 05:31 PM2016-06-26T17:31:19+5:302016-06-26T17:31:19+5:30
आठ दिवसांपूर्वी वाशिम येथून मूल येथे मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या तरूणासह दोन बालकांचा चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
चामोर्शी, दि. २६ - आठ दिवसांपूर्वी वाशिम येथून मूल येथे मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या तरूणासह दोन बालकांचा चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा येथे वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजता घडली.
वाशिम येथून आठ ते दहा दिवसांपूर्वी मूल येथील मामा प्रशांत अप्पलवार यांच्याकडे त्यांच्या बहिणीचे मुले अंकूर प्रशांत पाठक (२२) रा. वाशिम, वैभव प्रशांत पाठक (१६) रा. वाशिम हे आले होते. उन्हाळ्याच्या सुट्या संपल्याने गावाकडे जाण्यापूर्वी मार्र्कंडा येथे आपल्या कुटुंबासह रविवारी ते देवदर्शनासाठी आले.
यावेळी अंकूर पाठक, वैभव प्रशांत पाठक व गणेश प्रशांत अप्पलवार (१३) हे तिघे व तीन मुली नावेवर बसून आंघोळीसाठी दुस-या बाजुला गेले. ज्या ठिकाणी रेती कमी पडलेली आहे. ज्या ठिकाणापासून कमी असते. आंघोळ करीत असताना कमी पाणी आहे, असे समजून गणेश अप्पलवार हा १३ वर्षाचा मुलगा खोल पाण्यात जाऊ लागला व तो डुबायला लागला.
त्याला वाचविण्यासाठी वैभव व अंकूर हे दोघेही खोल पाण्यात गेले. त्यांना पोहता येत नसल्याने या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान या तिघांचे मृतदेह नावाडी नारायण राऊत, गणपती राऊत, परशुराम भोयर, पत्रू गेडाम, अंबादास शेरकी यांनी पाण्यातून बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरिक्षक किरण अवचार, पोलीस उपनिरिक्षक धर्मसिंग सुंदरडे, प्रशांत कंडारे, पोलीस हवालदार अशोक कुमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
तर प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतक कुटुंबाचे सांत्वन केले. जय मॉ दुर्गा मंडळाच्या रूग्णवाहिकेने अतुल बन्सोड याने तिन्ही मृतदेह ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे आणले. या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या नातेवाईकांची आमदार डॉ. देवराव होळी, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, मनोज पालारपवार, आनंद गण्यारपवार, जयराम चलाख, ज्ञानेश्वर कुनघाडकर, विनोद पेशेट्टीवार यांनी ग्रामीण रूग्णालय चामोर्शी येथे भेट घेऊन सांत्वन केले.