समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:00 PM2022-07-13T13:00:19+5:302022-07-13T13:01:22+5:30

अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.

Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman | समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

समुद्रस्नान जिवावर बेतलं, ओमानमध्ये समुद्रात सांगली जिल्ह्यातील जतचे तिघे बेपत्ता

Next

जत : कामानिमित्त दुबई येथे स्थायिक झालेले तिघे बाप-लेक ओमान येथे पर्यटनासाठी गेल्यानंतर समुद्रात बेपत्ता झाले आहेत. ही घटना रविवारी घडली. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शाेध लागलेला नाही. शशिकांत म्हमाणे, त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती व सहा वर्षांचा मुलगा श्रेयस अशी बेपत्ता झालेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेला जत येथील त्यांचे बंधू वकील राजकुमार म्हमाणे यांनी दुजोरा दिला आहे.

शशिकांत म्हमाणे दुबई येथील बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये यांत्रिकी अभियंता आहेत. अनेक वर्षे ते संयुक्त अरब अमिरातीमधील विविध कंपन्यांमध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत. यामुळे कुटुंबासह ते दुबईमध्येच स्थायिक झाले आहेत. रविवारी ईदच्या सुटीनिमित्त ते पत्नी सारिका, मुलगा श्रेयस, मुलगी श्रुती व अन्य काही मित्रांसोबत पर्यटनासाठी दुबईपासून जवळच असलेल्या ओमान येथील समुद्र किनाऱ्यावर गेले होते.

अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणामध्ये सहलीसाठी निघाल्याचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. ओमान येथील सलालाह समुद्रकिनारी प्रचंड लाटा उसळत असताना त्याठिकाणी हे सर्वजण समुद्रस्नानाचा आनंद घेत हाेते. अचानक एक माेठी लाट आल्याने शशिकांत म्हमाणे, त्यांची मुलगी श्रुती व मुलगा श्रेयस हे तिघेही समुद्रात बेपत्ता झाले.

या दुर्घटनेचा एक व्हिडिओही सध्या साेशल मीडियावर दिसत आहे. बेपत्ता व्यक्तींचा शाेध सुरू असल्याचे ओमानच्या प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. म्हमाणे कुटुंबातील वडील, मुलगा आणि मुलगी बेपत्ता झाल्याचे वृत्त समजताच जतमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Three people from Sangli district have gone missing in the sea in Oman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.