बस कंटेनरवर धडकून तीन ठार, १५ जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:26 AM2017-08-29T05:26:03+5:302017-08-29T05:26:13+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला
माणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील इंदापूर येथे कारला ओव्हरटेक करून पुढे गेलेली खासगी प्रवासी बस, समोरून येणा-या कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कंटेनर व बसचालकासह तिघांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये ८ जण गंभीर झाले असून, ७ जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.
या अपघाताची फिर्याद कारचालक रोहन रवींद्र लोकेगावकर (२६, रा. प्रभादेवी, मुंबई) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. रोहन लोकेगावकर हे कारने (एम एच ०१ बीटी ०१६२) कणकवलीहून मुंबई येथे जात होते. त्यांची गाडी इंदापूर येथे आली असता,गाडीमागून येणाºया चिराग ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र . एम.एच ०४ जीपी १६२७) कारला ओव्हरटेक केले व बसचालकाने मुंबईकडून येणाºया कंटेनरला (क्र . एम एच ४६ एच ५५३०) ला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बस व कंटेनरच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन, कंटेनरचालक रामकिशन जायभाये (३८, रा. दिवळनेर, ता. शिरूर), बाळकृष्ण दापले (४५, रा. मालाड मुंबई) हे दोन जण जागीच ठार झाले, तर बसचा चालक राजकुमार यादव (४५) याचा मुंबईला उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाला. या अपघातात लियाकत कासम रमदूल (४५), रजिया लियाकत रमदूल (४०), योगेश कृष्णा महाडिक (३२), सुनील कृष्णा नटे (४१), राहुल प्रकाश चौगुले (२४), वृषाली राहुल चौगुले (२४), प्राजक्ता प्रदीप गलांडे (३७), विनोद चेताराम राहू (१८) हे आठ जण गंभीर जखमी असून, इतर सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव उपजिल्हा रु ग्णालय व इंदापूर येथील रु ग्णालयात प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच, माणगाव पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन, त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करून जखमींना रु ग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करून, बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम करीत आहेत.
माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ज्ञानदेव कदम (३६, रा. महाड) जीप घेऊन मौजे लाखपाले गावाच्या हद्दीत आले असता, रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने जीप उलटून अपघात झाला. या अपघातात फिर्यादी ज्ञानेश्वर कदम, काशीराम कदम (६५), जितेंद्र कदम (३४), श्रुती कदम (३२), पूनम कदम (३२) सर्व रा. मुलुंड, मुंबई हे जखमी झाले असून, त्यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भिलारे हे करीत आहेत.