लोकलच्या धडकेत तिघे ठार

By Admin | Published: March 12, 2016 04:39 AM2016-03-12T04:39:35+5:302016-03-12T04:39:35+5:30

लोकलच्या धडकेत चारवर्षीय चिमुकल्यासह तीन जण ठार झाल्याची घटना जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडली. रूळ ओलांडत असताना ही घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Three people were killed in the blast | लोकलच्या धडकेत तिघे ठार

लोकलच्या धडकेत तिघे ठार

googlenewsNext

मुंबई : लोकलच्या धडकेत चारवर्षीय चिमुकल्यासह तीन जण ठार झाल्याची घटना जोगेश्वरी ते गोरेगावदरम्यान शुक्रवारी सायंकाळी घडली. रूळ ओलांडत असताना ही घटना घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. लोकलची धडक एवढी जोरदार होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची अपघाती नोंद बोरीवली रेल्वे पोलिसांत करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, रूळ ओलांडताना हा अपघात झाला आहे. यात तीन जण ठार झाले आहेत. याबाबत अधिक चौकशी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेचे गँगमन रूळांवरून जात असताना असेच रेल्वेच्या धडकेत ठार झाले होते. (प्रतिनिधी)
अपघातात ठार झालेल्यांमध्ये संतोष सडासम (४0), त्याची पत्नी रेणुका (३५) आणि अंशु कोल्हे (४) या तिघांचा समावेश आहे. अंशु कोल्हे हा रेणुकाचा भाचा आहे. जोगेश्वरी येथील ट्रॅकजवळील झोपड्यांमध्ये राहणारे संतोष आणि रेणुका, तिचा भाऊ आणि अंशु हे सायंकाळी साडेचारच्या सुमारास कामानिमित्त गोरेगाव येथे होते. काम उरकल्यानंतर त्यांनी गोरेगाव स्थानकातून लोकल पकडली आणि जोगेश्वरी स्थानकात उतरले.
त्यानंतर घरी जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर करण्याऐवजी त्यांनी जोगेश्वरी स्थानकाच्या ट्रॅकवरून चालण्याचा निर्णय घेतला. अंशुच्या वडिलांनी काम असल्याचे सांगत त्याला संतोष
व रेणुकाकडे सुपुर्द केले व अंशुला घरी सोडण्यास सांगितले.
संतोष, रेणुका हे अंशुला घेऊन ट्रॅकवरून चालत पूर्वेकडून पश्चिम दिशेला जात होते. मात्र त्याचवेळी विरारला जाणाऱ्या जलद लोकलचा अंदाज त्यांना आला नाही आणि त्यांना धडक बसली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Three people were killed in the blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.