विजय पाटीलसह तिघांना अटक
By Admin | Published: November 7, 2014 12:44 AM2014-11-07T00:44:54+5:302014-11-07T00:45:13+5:30
बेकायदा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मुंबई मटका जुगाराच्या आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांना समजले होते
कोल्हापूर : विजय ज्वेलर्स आणि विजय आॅनलाईन लॉटरीच्या नावाखाली कल्याण-मुंबई मटका घेणारा विजय पाटील याच्यासह तिघांना आज, गुरुवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. मिरजकर तिकटी येथील पाटील याच्या दुकानात छापा टाकून रोख रक्कम १३ हजार ५१०, संगणक, सीसीटीव्हीचा सेट, व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा असलेला पेन असा एकूण ४८ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
विजय पाटील याने मिरजकर तिकटी येथील बापट बोळातील तेजस अपार्टमेंटमधील विजय ज्वेलर्स आणि विजय आॅनलाईन लॉटरी सेंटर सुरू केले. त्यामध्ये राशीभविष्यावर आधारित व विजय ज्वेलर्स मधून विनापरवाना, बेकायदा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना मुंबई मटका जुगाराच्या आकड्याच्या चिठ्ठ्या देऊन मटका जुगार चालवत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) व (पान १० वर)जुना राजवाडा पोलिसांनी संयुक्तरित्या याठिकाणी आज छापा टाकून विजय लहू पाटील (वय ४८, रा. कांडगांव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), चंद्रकांत दामोदर कल्याणकर (वय ५२, रा. २७१९ सी वॉर्ड, जुना बुधवार पेठ कोल्हापूर), विलास जनार्दन गळगे (वय ६६, रा. २३६५ डी वॉर्ड, जुना बुधवार पेठ कोल्हापूर) या तिघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, ‘जुना राजवाडा’चे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक जे. डी. जाधव, उपनिरीक्षक गायकवाड आदींनी संयुक्तरित्या कारवाई केली. (प्रतिनिधी)