मुंबई महापालिका निवडणुकीतील तीन गरीब उमेदवार

By admin | Published: February 20, 2017 05:59 PM2017-02-20T17:59:54+5:302017-02-20T17:59:54+5:30

निवडणूका पैशांचा खेळ झाला असून, आर्थिकदृष्टया सशक्त उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उतरतात असा एक समज आहे.

Three poor candidates in the municipal corporation elections | मुंबई महापालिका निवडणुकीतील तीन गरीब उमेदवार

मुंबई महापालिका निवडणुकीतील तीन गरीब उमेदवार

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 20 - निवडणूका पैशांचा खेळ झाला असून, आर्थिकदृष्टया सशक्त उमेदवारच  निवडणुकीच्या रिंगणात उतरतात असा एक समज आहे. पण यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत असे तीन उमेदवार आहेत. ज्यांच्या नावावर कुठलीही संपत्ती नाही. एका उमेदवाराच्या खात्यात फक्त 5 हजार रुपये आहेत. निवडणूक लढवताना त्यांची सर्व मदार नातेवाईक, शेजारी आणि मित्रांवर अवलंबून आहे.  
 
अनिता बुधवंत 
काळाचौकीच्या 206 नंबर वॉर्डमधून अनिता बुधवंत (32) या बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. काळाचौकीच्या चटई चाळीत राहणा-या अनिता फक्त महिला उमेदवार म्हणून चर्चेत नाहीयत तर, त्यांनी उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत दाखवलेला नाही. त्या पहिल्यांदा निवडणूक लढवत असून त्यांचे पती ड्रायव्हर आहेत. ते घरातील एकमेव कमावते व्यक्ती असून, त्यांच्या नावावर कुठल्याही मालमत्तेची नोंद नाही. सध्या निवडणुकीचा रोजचा खर्च लाखो रुपयांच्या घरात आहे. असे असताना अनिता यांची सर्व मदार शेजारी, नातेवाईक, पक्ष कार्यकर्ते आणि मित्र परिवारावर अवलंबून आहे. 
 
शमिम कादरी, वॉर्ड - 223 
सामाजिक कार्याची पार्श्वभूमी असलेल्या शमिम पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी आणि त्यांच्या पतीने प्रतिज्ञापत्रावर स्वत:च्या नावावर काहीही संपत्ती दाखवलेली नाही. प्राध्यापक असलेल्या माझ्या मुलाने मला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिले. निवडणूकीसाठी तो मला आर्थिक मदत करत आहे. त्या भेंडी बाजारच्या  वॉर्ड 223 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.  माझ्या अन्य समाजसेवक मित्रांनी बॅनर आणि पत्रके छापून शक्य तितकी मदत केली. कादरी यांनी आतापर्यंत प्रचारावर 1 लाख रुपये खर्च केले असून, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. 
 
आकाश कांबळे 
अखिल भारतीय सेनेकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या आकाश कांबळकडे फक्त 5 हजार रुपये आहेत. 25 वर्षीय आकाश एमबीएचा विद्यार्थी असून, कुर्ल्याच्या वॉर्ड क्रमांक 166 मधून निवडणूक रिंगणात उतरला आहे. आकाश कांबळेकडे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. चेंबूरमधल्या कॉलेजमध्ये त्याचे एमबीएच शिक्षण सुरु आहे. त्याचे वडिल त्यांच्या समाजासाठी एका नियतकालिकाचे संपादन करतात. निवडणूक लढवण्यासाठी आकाशला त्याच्या वडिलांनी प्रोत्साहन दिले. माझ्या प्रचाराचा खर्च उचलण्याची माझ्या कुटुंबाची क्षमता नाही. मला 50 हजारांची गरज असून, नातेवाईक, कुटुंबिय मित्रांकडून कर्ज घेतले आहे. 
 

Web Title: Three poor candidates in the municipal corporation elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.