वेश्याव्यवसायातून विदेशी तरुणीसह तिघींची सुटका
By admin | Published: September 30, 2016 07:21 PM2016-09-30T19:21:43+5:302016-09-30T19:21:43+5:30
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून उझबेकीस्थानच्या एका तरुणीसह तिघींची सुटका केली.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ३० : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला असून उझबेकीस्थानच्या एका तरुणीसह तिघींची सुटका केली. पोलिसांनी कोरेगाव पार्क भागातील बेल एअर हॉटेलच्या महाव्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. तर चारजण पसार होण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेडी फर्नाडिस (वय 53, रा.आयसी कॉलनी, ऋषी कॉम्प्लेक्स, बोरिवली, मुंबई) आणि जेम्स अल्फान्सो (वय 27, रा. गंगाकुंज फ्लॅटनं. 108, कळस, विश्रांतवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्नांडिस हा हॉटेल बेल एअरचा महाव्यवस्थापक आहे. तर जेम्स हा व्यवस्थापक आहे. अश्विन उर्फ विवेक जगताप, कुणाल, अमित छत्री (रा. मुंबई) आणि रोहित असे चौघे पसार झाले आहेत. हॉटेल बेल एअरमध्ये परदेशी युवतीसह काही भारतीय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना मिळाली होती.
त्यानुसार अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी.एच. वाकडे, उपायुक्त पी.आर. पाटील आणि सहाय्यक आयुक्त अरूण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहाय्यक निरीक्षक शीतल भालेकर आणि त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाक त कारवाई केली.