गोव्यात तीन रशियन महिलांना जलसमाधी

By admin | Published: October 29, 2014 02:18 AM2014-10-29T02:18:48+5:302014-10-29T02:18:48+5:30

रशियन पर्यटकांना घेऊन जलसफर करणारी मोटरबोट मंगळवारी सकाळी खणगिणी समुद्रात उलटल्याने एलिना कुलेकोरा (46) या रशियन महिलेसह अन्य दोघा महिलांना जलसमाधी मिळाली.

Three Russian women in Goa get water | गोव्यात तीन रशियन महिलांना जलसमाधी

गोव्यात तीन रशियन महिलांना जलसमाधी

Next
कुंकळ्ळी : समुद्र खवळलेला असतानाही रशियन पर्यटकांना घेऊन जलसफर करणारी मोटरबोट मंगळवारी सकाळी खणगिणी समुद्रात उलटल्याने एलिना कुलेकोरा (46) या रशियन महिलेसह अन्य दोघा महिलांना जलसमाधी मिळाली.
स्थानिक जीवरक्षकांनी 11 पर्यटकांसह 3 बोटचालकांचे जीव वाचविले. मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास मोबोर जेटीवरून रशियन पर्यटकांना घेऊन एक वॉटर स्पोर्ट्स बोट साळ नदी पार करून समुद्र सफरीला गेली होती. समुद्र खवळल्यामुळे चालकाने बोट किना:यावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र लाटांच्या प्रवाहामुळे बोट पर्यटकांसह उलटली. बोटीत चौदा रशियन पर्यटक होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Three Russian women in Goa get water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.