मुंबईतील रस्ते घोटाळ्यात तिघे अटकेत

By admin | Published: June 22, 2016 04:38 AM2016-06-22T04:38:55+5:302016-06-22T04:38:55+5:30

महानगर पालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात मंगळवारी सकाळी दत्तात्रय सुदान धस (एम/एस महावीर रोड अ‍ॅण्ड इन्फ्रा.), आशिष रामनाथ जैस्वाल (एम. एस जे. के. कुमार कंन्स्ट्रक्शन जेवी) आणि ऋषिकेश गजानन शिंदे

Three suspects in Mumbai's road rage | मुंबईतील रस्ते घोटाळ्यात तिघे अटकेत

मुंबईतील रस्ते घोटाळ्यात तिघे अटकेत

Next

मुंबई : महानगर पालिकेच्या रस्ते घोटाळा प्रकरणात मंगळवारी सकाळी दत्तात्रय सुदान धस (एम/एस महावीर रोड अ‍ॅण्ड इन्फ्रा.), आशिष रामनाथ जैस्वाल (एम. एस जे. के. कुमार कंन्स्ट्रक्शन जेवी) आणि ऋषिकेश गजानन शिंदे (एम/एस जे. कुमार - के. आर कंन्स्ट्रक्शन) या साइट इंजिनिअरना अटक करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या २२ झाली आहे.
या सर्वांवर संगनमत करून खोटी बिले पालिकेला दाखवून ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या साथीनेच त्यांनी हा प्रताप केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पालिकेच्या काही संशयित अधिकाऱ्यांचीही चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त
मनोज शर्मा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Three suspects in Mumbai's road rage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.