‘डिजिटल कॉर्नर’साठी तीन निविदा

By Admin | Published: July 2, 2015 01:06 AM2015-07-02T01:06:54+5:302015-07-02T01:06:54+5:30

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने हाती घेतलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पासाठी तीन निविदा दाखल झाल्या असून, त्या निविदांची पडताळणी सुरू झाली आहे.

Three tenders for 'Digital Corner' | ‘डिजिटल कॉर्नर’साठी तीन निविदा

‘डिजिटल कॉर्नर’साठी तीन निविदा

googlenewsNext

मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने हाती घेतलेल्या ‘डिजिटल कॉर्नर’ प्रकल्पासाठी तीन निविदा दाखल झाल्या असून, त्या निविदांची पडताळणी सुरू झाली आहे. यातील तिन्ही निविदांमधील एक निविदेवर शिक्कामोर्तब करून या प्रकल्पाची पुढील प्रक्रिया सुरू होईल.
डिजिटल कॉर्नरचा प्रकल्प (अंकलिखित) गेल्या वर्षापासून हाती घेतला आहे. १७५१ पासूनच्या अनेक दुर्मीळ ग्रंथांचे या प्रकल्पात डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून निधी गोळा केला जात असून, आतापर्यंत सहा लाख रुपयांचा निधी जमा झाल्याची माहिती कायर्वाह प्रेमानंद भाटकर यांनी नुकतीच दिली.
ग्रंथसंग्रहालयाकडे दाखल झालेल्या निविदांवर विचारविनिमय सुरू असून कार्याध्यक्ष अनिल माने अंतिम निर्णय घेतील, असे भाटकर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी मागवण्यात आलेल्या निविदांचा खुलासा करण्यात येईल. हा प्रकल्प एक कोटीचा असून तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे भाटकर म्हणाले.

Web Title: Three tenders for 'Digital Corner'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.