तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 12:06 PM2019-12-09T12:06:56+5:302019-12-09T12:07:24+5:30

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा 3 हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे. 

Three thousand Maratha agitators consoled; Chief Minister Thackeray recommends withdrawal of crime | तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

तीन हजार मराठा आंदोलकांना दिलासा; मुख्यमंत्री ठाकरेंकडून गुन्हे मागे घेण्याची शिफारस

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी मागील दहा दिवसात पाच प्रकरणांतील गुन्हे मागे घेण्याचे निर्णय घेतले आहेत. उद्धव यांनी स्थानिक न्यायालयातील मराठा आंदोलकांवर दाखल असलेले 288 गुन्हे रद्द करण्याची विनंती केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे तीन हजार आंदोलक युवकांना दिलासा मिळणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मेट्रो कारशेड, नाणार प्रकल्प, कोरेगाव भीमा हिंसा, शेतकरी आंदोलन आणि मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची शिफारस केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मराठा आंदोलकांवर असलेले 35 गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. यामध्ये विरोध करताना पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झालेले आणि पोलिस कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी जखमी झालेले आहेत अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या निर्णयाचा 3 हजार मराठा युवकांना फायदा होणार आहे. सरकारने गुन्हे रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांद्वारे स्थानिक न्यायालयांना शिफारस केली आहे. यावर आता न्यायालय निर्णय घेणार आहे. 
 

Web Title: Three thousand Maratha agitators consoled; Chief Minister Thackeray recommends withdrawal of crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.