ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरीय व्यवस्था
By admin | Published: October 17, 2014 02:11 AM2014-10-17T02:11:19+5:302014-10-17T02:11:19+5:30
मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रस्थळी उभारलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
Next
नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएम संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रस्थळी उभारलेल्या स्ट्रॉंग रुम्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
12 मतदार सघांपैकी शहरात सहा आणि ग्रामीणमध्ये सहा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी मतमोजणीस्थळाजवळ स्वतंत्र स्ट्रॉंग रूम तयार केली आहे. मतदानानंतर सर्व केंद्रावरील ईव्हीएम तेथे सील करून ठेवण्यात आल्या. रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्यात येणार असून, देखरेख ठेवण्यासाठी अधिका:यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाहेरून येणा:यांना तेथे प्रवेश बंदी आहे. गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास थेट कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)
काटोल मतदारसंघातील ईव्हीएम तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात, सावनेरच्या शासकीय आयटीआयमध्ये, हिंगण्याच्या तेथील तहसील कार्यालयात, उमरेडच्या नुतन आदर्श महाविद्यालयात, कामठीच्या आयटीआय मौदा, रामटेकच्या आयटीआय रामटेक तसेच शहरातील दक्षिण-पश्चिमच्या ईव्हीएम कुव्रेज न्यू मॉडेल हायस्कूल, दक्षिण नागपूरच्या सांस्कृतिक बचत भवन बर्डी, पूर्वच्या ईश्वर देशमुख शारीरिक महाविद्यालय, मध्यच्या शेतकरी भवन, फुटाळा, पश्चिम नागपूर गुंडेवार महाविद्यालय, उत्तर नागपूरच्या ईव्हीएम जिल्हा परिषद शाळा काटोल रोड येथील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. सर्वच मतदारसंघात स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी रविवारी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.