पोलीस चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार
By admin | Published: June 20, 2016 04:14 AM2016-06-20T04:14:31+5:302016-06-20T04:14:31+5:30
शिरावर चार लाखांचे बक्षीस असलेला माओवादी संघटनेचा आदिलाबाद जिल्हाप्रमुख आत्राम शोभन ऊर्फ चार्लीस (३६) याच्यासह तीन नक्षलवादी पोलिसांच्या चकमकीत रविवारी ठार झाले
बी. संदेश, आदिलाबाद/ गडचिरोली
शिरावर चार लाखांचे बक्षीस असलेला माओवादी संघटनेचा आदिलाबाद जिल्हाप्रमुख आत्राम शोभन ऊर्फ चार्लीस (३६) याच्यासह तीन नक्षलवादी पोलिसांच्या चकमकीत रविवारी ठार झाले. अहेरी तालुक्यातील काटेपल्ली जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलाचे विशेष अभियान पथक आणि हैदराबाद ग्रेहॉन्स पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
काटेपल्ली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविले जात असताना लपून बसलेल्या
नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या चकमकीत चार्लीस याच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील मुकेश ऊर्फ प्रभाकर व दिनेश ऊर्फ वसंता ठार झाले. पोलीस आणखी आक्रमक झाल्यावर इतर नक्षल्यांनी जंगलात पळ काढला.
माओवादी संघटनेचा जिल्हा प्रमुख चार्लीस हा तिरयांनी मंडलच्या रोमपल्ली येथील रहिवासी होता. तो २००४ मध्ये नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला. अल्पावधीत जिल्ह्यात व महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात त्याने मोठ्या प्रमाणात नक्षल भरती केली. त्यामुळे त्याला डीसीएम (जिल्हा प्रमुख) बनविण्यात आले.