ठाण्यासह राज्यात उष्माघाताचे तीन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 12:52 AM2017-04-13T00:52:28+5:302017-04-13T00:52:28+5:30
राज्यात उष्माघाताने तीन बळी घेतले असून कोकणातील भिरा येथे ४४़५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़
मुंबई : राज्यात उष्माघाताने तीन बळी घेतले असून कोकणातील भिरा येथे ४४़५ अंश सेल्सिअस इतके सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़ सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बालानगर येथील शंकर भागचंद घोंगडे (१८) याचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. बालानगर येथे ३१ मार्चला दीपाली ऋषी गोर्डे (१७) हिचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता. शहापूर (ठाणे) तालुक्यात टँकरअभावी तब्बल १० किमी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या दांड गावातील तुकाराम ठमा आगिवले (३५) याचाही उष्माघाताने मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील फे्रजरपुरा परिसरातील रहिवासी गणेश सहारे यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)