तीनचाकीचे स्टिअरिंग तुमच्या हाती, पण सवारीमुळे भरकटले; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:05 AM2020-07-28T05:05:45+5:302020-07-28T05:06:15+5:30

; सरकार पाडण्यात रस नाही

Three-wheeled steering wheel in your hand; But the ride strayed : Devendra Fadnavis | तीनचाकीचे स्टिअरिंग तुमच्या हाती, पण सवारीमुळे भरकटले; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

तीनचाकीचे स्टिअरिंग तुमच्या हाती, पण सवारीमुळे भरकटले; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

Next

विशेष प्रतिनिधी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचं स्टिअरिंग तुमच्या हाती आहे; पण रिक्षात बसलेले प्रवासी तुम्हाला कधी उत्तरेकडे, कधी दक्षिणेकडे नेतात, कोणी ब्रेक दाबतंय, कुणी मधेच हॉर्न वाजवत असल्याने सरकार भरकटलं आहे. हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही पण तुम्ही सरकार चालवून तरी दाखवा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश आदी उपस्थित होते. एकमेकांच्या तंगड्या तोडणारं हे सरकार अंतर्विरोधाने पडेल. हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. बेईमानीने बनलेले सरकार आहे. कोरोनावर मात करण्यात सरकार अपयशी ठरत असून टेस्टिंग वाढविण्याची गरज आहे. दूधप्रश्नी १ आॅगस्टपासून राज्यभर आंदोलन करणार आहे, असे त्यांनी सांगितले. ऊस, साखरप्रश्नी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. त्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत टिपण्णी केली आहे. पण साखर उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राने स्थापन केलेल्या मंत्रिगटाचे प्रमुख अमित शहा आहेत हे मुख्यमंत्र्यांना माहिती असू नये?, असा सवाल त्यांनी केला.


आता स्वबळावर सत्ता
राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भविष्यात स्वबळावर सत्ता आणण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले. कोरोनाचा मुकाबला करण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले असून हे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर प्रभावीपणे मांडावे, असे ते म्हणाले.

Web Title: Three-wheeled steering wheel in your hand; But the ride strayed : Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.