तीन वर्षांचे बालक : बोअरवेलमध्ये पडून झाले ५० तास
By admin | Published: March 12, 2016 04:14 AM2016-03-12T04:14:47+5:302016-03-12T04:14:47+5:30
बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात तीन वर्षांचा विक्की पडल्याला ५० तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हात
सडक अर्जुनी (गोंदिया) : बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात तीन वर्षांचा विक्की पडल्याला ५० तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हात टेकल्यानंतर आता मध्य प्रदेशातील बालाघाट येथून खोळसा खाणीमधील अभियंत्यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी ४च्या सुमारास देवराम चांदेवार यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये विक्की पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी दोन दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; पण अजून त्यात यश आले नाही. बोअरवेलच्या खड्ड्यापासून काही अंतरावर जेसीबीने ५० फुटांपेक्षा जास्त खोदकाम करून दुसरा खड्डा करण्यात आला. पण त्यात पाणी लागल्यामुळे माती खचली. या वेळी रेस्क्यू आॅपरेशन राबविणाऱ्या पथकाचे सदस्य सुदैवाने थोडक्यात बचावले. विक्कीला खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी आता बाघालाट येथील मायनिंग टीम रात्रीपर्यंत घटनास्थळी पोहोचणार आहे. (प्रतिनिधी)