तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगीक अत्याचार
By admin | Published: February 21, 2017 08:34 PM2017-02-21T20:34:39+5:302017-02-21T20:34:39+5:30
महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या ३ वर्षीय चिमुरडीवर शाळेत
ऑनलाइन लोकमत
चिखली (बुलडाणा), दि. 21 : महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच चिखलीतही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या ३ वर्षीय चिमुरडीवर शाळेत मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या १९ वर्षीय पवन शेवत्रे या नराधमाने लैंगीक अत्याचार केल्याची धक्कादायक घडना २१ फेबु्रवारी रोजी उघडकीस आली. दरम्यान आरोपीस अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
येथील चाटे किड्समध्ये नर्सरीला शिकणाऱ्या एका ३ वर्षिय चिमुरडीच्या पोटात दुखत असल्याची तक्रार तिने आईकडे १५ फेब्रुवारी रोजी शाळेतून परत आल्यानंतर केली होती. त्यामुळे तीच्या आईने तीला पोटदुखीवरचे औषध दिले होते. दरम्यान १६ तारखेला सुटी असल्याने ती घरीच होती. मात्र, १७ तारखेला पुन्हा शाळेतून आल्यानंतर तिचे पोट दुखत असल्याचे तीने तीच्या आईला सांगीतले. त्यावरून या चिमुरडीच्या आईने शाळेत शिक्षीकेला विचारणा केली.
मात्र शाळेत खेळत असताना लागले असेल म्हणून याबाबीकडे दूर्लक्ष झाले होते. तर १८ व १९ फेब्रुवारी रोजी तीला बरे वाटत नसल्याने ती शाळेत गेली नाही. मात्र, २० फेब्रुवारी रोजी पुन्हा शाळेत ही चिमुरडी आपल्या आईसोबत गेली असता तेथे पवन शेवत्रे याला पाहून किंचाळली व रडू लागली व नराधामास पाहून भेदरलेली ही चिमुरडी शाळेत जाण्यास नकार देवू लागली. दरम्यान, या प्रकारावरून एक सुजान महिला नातेवाईकेने समयसुचकतेने व चिमुरडीला विश्वासात घेवून विचारपूस केल्याने शाळेतील हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी नराधम पवन शेवत्रे याच्याविरूध्द बाललैंगीक अत्याचार कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा
न्यायालयाने त्यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.