बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 08:03 PM2019-05-14T20:03:33+5:302019-05-14T20:04:07+5:30

स्टिंग ऑपरेशन करत उघडकीस आणलेल्या बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान प्रकरणामध्ये डॉ. नीना मथरानी या दोषी आढळल्या होत्या...

three years imprisonment and a fine of ten thousand rupees to doctor in case of illegal Pre-Natal Diagnostic | बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा  

बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणी डॉक्टरला तीन वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा  

Next
ठळक मुद्देराज्यातील पहिला गुन्हा : आठ वर्षांच्या लढ्यानंतर आले यश

पुणे : पालिकेने स्टिंग  ऑपरेशन करत उघडकीस आणलेल्या बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान प्रकरणामध्ये दोषी आढळलेल्या महिला डॉक्टरलान्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी पाच महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे. पालिकेकडून २०११ साली याप्रकरणी राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल आठ वर्ष न्यायालयामध्ये चाललेल्या खटल्यामध्ये पालिकेच्या विधी आणि आरोग्य विभागाला यश आले आहे. 
डॉ. नीना अनिल मथरानी असे शिक्षा झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांनी फिर्याद दिली होती. शासनाने १९९१ साली गर्भलिंगनिदान कायदा केला होता. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २०११ साली सुरु करण्यात आली. सदाशिव पेठेतील नागनाथपारा जवळील डॉ. मकरंद रानडे यांच्या रुग्णालयामध्ये बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला होता. आरोग्य विभागाने बनावट ग्राहक पाठवत स्टींग आॅपरेशन केले होते. त्यासाठी संबंधित डॉक्टरांना देण्यासाठी बिलाचे पैसेही दिले होते. 
डॉ. रानडे यांच्या रुग्णालयामध्ये जाऊन गर्भलिंगनिदानासंदर्भात चौकशी केल्यावर त्यांनी डॉ. नीना मथरानी यांच्या लक्ष्मी रस्त्यावरील नमित डायग्नॉस्टीक सेंटरमध्ये पाठविले. त्यांच्याशी काहीही बोलायचे नाही, त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट माज्याकडे पाठवतील अशा सूचना डॉ. रानडे यांनी केल्या होत्या. त्यानुसार सोनोग्राफी करण्यात आली. या सोनोग्राफीचा फॉर्म भरण्यात आला नाही. तसेच कोणतीही अधिकृत नोंदणी करण्यात आलेली नव्हती. सोनोग्राफी झाल्यानंतर आरोग्य विभागाने मशीन सील करुन दोघांच्याही रुग्णालयाची नोंदणी रद्द केली होती. डॉ. रानडे आणि डॉ. मथरानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली होती. दरम्यान, सहा वर्षांपुर्वी डॉ. रानडे यांचे निधन झाले. या प्रकरणामध्ये पालिकेच्यावतीने विधी अधिकारी अ?ॅड. मंजुषा इधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड. अनंत रणदिवे यांनी काम पाहिले.
====
गर्भलिंगनिदान प्रकरणी पालिकेने दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत सात प्रकरणांमध्ये शिक्षा झालेली असून २०११ पासूनचे ४८ खटले न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. 
====
   गर्भलिंगनिदान प्रकरणांमध्ये पुणे महापालिकेने आतापर्यंत उत्तम कामगिरी केलेली आहे. डॉ. मथरानी यांना शिक्षा झाली ही समाधानाची बाब आहे. परंतू, रेडीओलॉजिस्ट आणि गायनॉकलॉजिस्टविरुद्ध कारवाई केल्यास त्यांच्याकडून दबाव आणायला सुरुवात होते. यंत्रणांवर आणि अधिकाºयांवर दबाव आणण्यासाठी मानसिक त्रास देणे, न्यायालयात खोट्या तक्रारी करणे असे प्रकार सुरु होतात. अशा वेळी वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या शिक्षा झाल्यास दोषींवर वचक बसेल. प्रबोधनासोबतच कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. 
- डॉ. महेश झगडे, माजी महापालिका आयुक्त

Web Title: three years imprisonment and a fine of ten thousand rupees to doctor in case of illegal Pre-Natal Diagnostic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.