छेडछाड करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

By admin | Published: June 25, 2016 03:43 AM2016-06-25T03:43:54+5:302016-06-25T03:43:54+5:30

एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. विलास गजानन पोटे (२३, रा. खोलापूर कसबा) असे आरोपीचे नाव आहे.

Three years of punishment for the abuser | छेडछाड करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

छेडछाड करणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा

Next

अमरावती : एका अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. विलास गजानन पोटे (२३, रा. खोलापूर कसबा) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना २ जून २०१३ रोजी घडली होती. आरोपी पीडित मुलीच्या खालापूर कसबा येथील घरात मध्यरात्री जबरदस्तीने शिरला. त्याने पीडित मुलीला झोपेतून उठवून घराबाहेर अंगणात नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब तिच्या वडिलांच्या लक्षात येताच आरोपीने पलायन केले. घटनेची तक्रार खोलापूर पोलीस ठाण्यात नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४४८, ५०६ आणि पोस्को कलम ८ नुसार गुन्हा नोंदविला. एएसआय दिगंबर वानखडे यांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Three years of punishment for the abuser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.