मुंबईतील ३ तरूण 'इसिस'मध्ये सामील?

By Admin | Published: December 21, 2015 10:44 AM2015-12-21T10:44:45+5:302015-12-21T11:30:34+5:30

मुंबईतील मालवणी येथून गेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेले तीन तरूण कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये सामील झाल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे

Three youth in Mumbai join 'Isis'? | मुंबईतील ३ तरूण 'इसिस'मध्ये सामील?

मुंबईतील ३ तरूण 'इसिस'मध्ये सामील?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - पुण्यातील अवघी १६ वर्षांची तरूण इसिसमध्ये जाण्याच्या तयारीत असताना एटीएसने तिला रोखल्याची घटना ताजी असतानाच मुंबईतील तीन तरूण इसिसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून गेल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मालवणी येथून गेल्या दोन महिन्यांपासून गायब असलेले तीन तरूण कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'मध्ये सामील झाल्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे. अयाज सुलतान (२३), मोहसीन शेख (२६) आणि वाजिद शेख (२५) अशी त्यांची नावे असून एकाच परिसरात राहणारे हे तीन मित्र तिघेही ब-याच काळापासून बेपत्ता असून ते इसिसच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता एटीएसच्या वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
हे तिघेही ब-याच काळापासून देश सोडून जाण्याच्या विचारात होते आणि त्यासाठी पैसेही साठवत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळत आहे. कुवेतमधील कंपनीने नोकरीची ऑफर दिल्याचे सांगत अयाज सुलतान (२३) हा तरूण ३० ऑक्टोबरला पुण्याला रवाना झाला. त्यानंतर मोहसीन शेख व वाजिद शेख हे दोघेही १६ डिसेंबर रोजी घरातून गायब झाले, मोहसीनने मित्राच्या लग्नाचे कारण दिले तर वाजिद आधारकार्ड दुरूस्तीच्या बहाण्याने बाहेर पडला आणि ते दोघेही अद्यापही घरी परतलेले नाहीत. एटीएसने त्या तिघांचे फोटो जारी केले आहेत.
महिनाभर उलटून गेल्यावरही अयाज परत न आल्याने आणि त्याचे दोन मित्रही डिसेंबरमध्ये गायब झाल्याने त्याच्या आईच्या मनात शंकेची पाल चुकचुली. एरवी अतिशय प्रेमळपणे, मनमिळाऊपणे, घराची व भावंडांच्या शिक्षणाची जबाबादारी उचलणारा अयाज गेल्या काही महिन्यांपासून बदलला होता. त्याचे कामात बिलकूल लक्ष नव्हते, तो सतत फोन किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटनवर काम करत असायचा, असे त्याच्या आईने सांगितले. मात्र काही दिवसांनी तो परत पूर्वीसारखा वागू लागला, सगळ्यांची काळजी घेऊ लागला. एक नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी आपलं घर गहाण ठेऊन पैसे उभे केल्याचे त्याने आईला सांगितले, मात्र ३० ऑक्टोबर रोजी पुण्यात नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावल्याचे सांगत तो कपड्यांची बॅग व पासपोर्ट घेऊन निघून गेला आणि परत आलाच नाही, अशी माहिती त्याच्या आईने दिले. काही दिवसांनी त्याचे मित्र मोहसीन आणि वाजिद हेही गायब झाल्याचे अयाजच्या आईला समजले आणि त्यांनी मालवणी पोलिसांत धाव घेऊन ही माहिती दिली. 
आपली मुले इसिसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून  निघून गेल्याचा संशय त्यांनी पोलिसांसमोर व्यक्त करताच, पोलिसांनी या घटनेची माहिती एटीएसला दिली. एटीएस एधिका-यांनी या तिघांच्याही मित्रांची कसून चौकशी केली तसेच वाजिदचा फोन चेक केला असात तो इसिबद्दलच्या माहितीने भरलेला होता. या तिघांपैकी अयाज हा आधीच देशबाहेर पडल्याचा अंदाज अधिका-यांनी व्यक्त केला आहे, मात्र वाजिद व मोहसीनबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. 
यापूर्वी मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार युवक इसिसमध्ये सामील होण्यासाठी सीरियाला रवाना झाले होते, त्यातील एक तरूण अरीब माजिदला देशात परत आला असून सध्या तो एनआयएच्या कोठडीत आहे, मात्र इतर तीन तरूणांचे काय झाले याबद्दल काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

Web Title: Three youth in Mumbai join 'Isis'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.