होलोग्रामच्या माध्यमातून शासनाला ५ हजार कोटींचा लाभ होईल - एकनाथराव खडसे यांचा दावा

By admin | Published: August 21, 2016 06:09 PM2016-08-21T18:09:30+5:302016-08-21T18:35:26+5:30

होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरु

Through the hologram, the government will get 5 thousand crores of rupees - the claim of Mr. | होलोग्रामच्या माध्यमातून शासनाला ५ हजार कोटींचा लाभ होईल - एकनाथराव खडसे यांचा दावा

होलोग्रामच्या माध्यमातून शासनाला ५ हजार कोटींचा लाभ होईल - एकनाथराव खडसे यांचा दावा

Next

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ : बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी राज्य शासनातर्फे बाटलीवर होलोग्रामचा वापर करण्यासाठीचे कंत्राट मुख्यमंत्र्यांनी रद्द केले नसून ते तांत्रिक दुरुस्ती आणि त्याची जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी रविवारी जळगाव येथे पत्रकारांशी बोलतांना दिली.

शासनाला ५ हजार कोटींचा फायदा
ते म्हणाले, बनावट मद्याची विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री असताना मद्याच्या बाटलीवर होलोग्राम लावण्याचा निर्णय घेतला होता. परवानाधारक मद्यप्राशन करणाऱ्या इसमाला होलोग्रामद्वारे बनावट मद्य ओळखण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान मोफत देणार होतो. या माध्यमातून मद्याचा काळाबाजार थांबून शासनाच्या तिजोरीत वार्षिक ५ हजार कोटींच्या उत्पन्नाची भर पडणार आहे.

शासनाला एक रुपयाचा खर्च नाही
होलोग्राम तयार करणारा ठेकेदार व मद्य उत्पादन करणारी कंपनी यांच्यात हा व्यवहार होणार आहे. संबधित ठेकेदाराने मागणीनुसार होलोग्राम तयार करून मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला ते पुरवायचे आहे. त्याबदल्यात येणारा खर्च हा संबधित ठेकेदाराने मद्य उत्पादन करणाऱ्या कंपनीमालकाकडून घ्यायचा आहे. मात्र हे तंत्रज्ञान वापराचे जे निकष आहे त्याचे कंत्राट शासनातर्फे काढण्यात आले आहे. यासाऱ्यात शासनाला एक रुपया द्यायचा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बनावट मद्याचा काळाबाजार रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसह आपण सुरुवातीपासून आग्रही आहोत. त्या संदर्भात दोन वेळा मंत्रालयात सादरीकरण करण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात आली होती. हे कंत्राट देशस्तरावर आहे. आता जागतिकस्तरावर निविदा प्रसिद्ध करण्याबाबत तसेच या कंत्राटामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहे त्या दूर करण्याबाबत शासनाचा विचार सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मीडिया ट्रायल अजून संपलेली नाही
बनावट मद्य रोखण्यासाठी होलोग्राम तंत्रज्ञानाच्या संदर्भात ही वस्तुस्थिती असताना हजार कोटींचे कंत्राट रद्द केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे आपल्याबाबत सुरु असलेली मीडिया ट्रायल अजून संपलेले नाही. मद्याच्या बाटलीवर होलोग्राम बसल्यामुळे बनावट दारूचा काळाबाजार बंद होऊन अनेकांना फटका बसणार आहे. त्यामुळे यासाऱ्यातून दिशाभूल करण्याचे प्रकार सुरु असल्याचे खडसे म्हणाले.

Web Title: Through the hologram, the government will get 5 thousand crores of rupees - the claim of Mr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.