मुलीला नदीत फेकणा:या त्या सावत्र पित्याला अखेर अटक
By admin | Published: July 5, 2016 08:54 PM2016-07-05T20:54:18+5:302016-07-05T20:54:18+5:30
पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. ५ : पत्नी बरोबर एकत्र नांदण्यावरुन झालेल्या वादातून सावत्र मुलीला उल्हास नदीत फेकणा:या पित्याला अखेर वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 7 जुलैर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत. तुळशीराम सैनी (38) असे या पित्याचे नाव असून त्याने एकता परवीन सिंग (9) या त्याच्या मुलीचे 29 जून रोजी सायंकाळी 7 वा. च्या सुमारास साथीदाराच्या मदतीने ठाण्याच्या लोकमान्यनगर येथून अपहरण केले होते. त्यानंतर त्याने तिला बदलापूर येथील उल्हास नदीच्या पात्रत निर्दयीपणो फेकून दिले. या पात्रत पडल्यानंतर जलपर्णीत अडकल्यामुळे या चिमुरडीने तब्बल 1क् तास मृत्यूशी कडवी झुंज दिली. दरम्यान, सकाळी काही कामगारांना ती दिसल्यानंतर पोलीस आणि अगिअशमन दलाच्या जवानांनी तिची सुटका केली. एकता ही तिची आई निर्मला तुळशीराम सैनी हिच्यासोबत ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहते. निर्मला आणि तुळशीराम या दोघांचेही एकमेकांसोबतचे हे दुसरे लग्न आहे. मात्र लगआनंतर दोघांमध्ये वाद सुरु झाल्याने ते दोघेही वेगळे राहत आहेत. तुळशीराम हा निर्मलाला एकत्र राहण्याकरिता पुण्याला येण्याचा आग्रह करीत होता. मात्र त्याच्या त्रसाला कंटाळल्याने निर्मलास ठाण्यात स्वतंत्र राहायचे होते. याच वादातून त्याने संतापाच्या भरात एकताला फेकल्याची कबुली पोलिसांना दिल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी दिली. तो कल्याण नजिकच्या नांदीवलीतील त्याच्या घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. एन. सातदिवे यांच्या पथकाने त्याला हाजीमलंग रोड कल्याण येथील साईधाम अपार्टमेंट येथून मंगळवारी सकाळी 9.3क् वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावीत यांनी सांगितले.