येत्या २४ तासांत जोर‘धार’, वेधशाळेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 05:43 AM2017-08-29T05:43:11+5:302017-08-29T17:39:21+5:30

ऐन गणेशोत्सवात संततधारेने चांगलाच जोर पकडला असून, पावसाच्या वाढत्या सरींमुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीही वाढली असून, सोमवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे

Thrust in the next 24 hours, Observatory warning | येत्या २४ तासांत जोर‘धार’, वेधशाळेचा इशारा

येत्या २४ तासांत जोर‘धार’, वेधशाळेचा इशारा

googlenewsNext

मुंबई : ऐन गणेशोत्सवात संततधारेने चांगलाच जोर पकडला असून, पावसाच्या वाढत्या सरींमुळे पडझडीच्या घटनांत वाढ झाली आहे. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीही वाढली असून, सोमवारी दिवसभर लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या जोरदार, अतिजोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
सोमवारी बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे तर संततधार कायम होती.
पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ, दादर, माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली. पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला डेपो, शीतल सिनेमागृह, कमानी आणि घाटकोपर येथील श्रेयस टॉकीज येथील वाहतुकीचा वेग मंदावल्याने कोंडीत वाढ झाली होती. सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरही वाहतूक संथ झाल्याने कोंडीत वाढ झाली होती. परिणामी, चेंबूर आणि कुर्ल्याकडे जात असलेल्या रस्त्यावर वाहनांची गर्दी कायम होती. कुर्ला-अंधेरी रस्त्यावरही वाहतुकीचा वेग मंदावला होता. परिणामी, कमानी, बैलबाजार, साकीनाका, मरोळ येथील कोंडीत वाढ झाली. पश्चिम उपनगरात सांताक्रुझ, विलेपार्ले, बोरीवलीसह रेल्वे स्थानकांकडे जाणाºया वाहनांचा वेगही संथ होता.
दरम्यान शहरात दोन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या. तर पूर्व उपनगरात दोन, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन अशा एकूण तीन ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डोंगरीमध्ये एक जखमी
शहरात दोन, पूर्व उपनगरात एक आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण चार ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याच्या घटना घडल्या.
दरम्यान येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Thrust in the next 24 hours, Observatory warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.