ठगबाज वासनकर गजाआड

By Admin | Published: July 28, 2014 01:36 AM2014-07-28T01:36:01+5:302014-07-28T01:36:01+5:30

हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या वासनकर समूहाचा प्रमूख ठगबाज प्रशांत जयदेव वासनकर (रा. कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) याच्यासह तिघांना आज अखेर गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली.

Thugabab Wasanakar Ghazaad | ठगबाज वासनकर गजाआड

ठगबाज वासनकर गजाआड

googlenewsNext

भाऊ आणि मेव्हण्यालाही अटक : गुन्हेशाखेची कारवाई
नागपूर : हजारो ठेवीदारांचे शेकडो कोटी रुपये गिळंकृत करणाऱ्या वासनकर समूहाचा प्रमूख ठगबाज प्रशांत जयदेव वासनकर (रा. कॉसमॉस टाऊन, त्रिमूर्तीनगर) याच्यासह तिघांना आज अखेर गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली.
नागपुरातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करणाऱ्या वासनकर समूहाचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर तसेच त्याची पत्नी भाग्यश्री प्रशांत वासनकर व विनय जयदेव वासनकर, मैथिली विनय वासनकर, अभिजित जयवंत चौधरी आणि कुमुद चौधरी तसेच त्यांच्याकडे कर्मचारी म्हणून काम करणारे चंद्रकांत, देवदत्त करडले आणि खापरे या ९ जणांविरुद्ध गुन्हेशाखेने ९ मे रोजी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते.
या घडामोडीनंतर वासनकरकडे रक्कम अडकलेले हजारो हवालदिल ठेवीदार आपली रक्कम परत मिळावी म्हणून वासनकरच्या कार्यालयात धाव घेत होते. त्यांच्यासोबत वासनकरचे कर्मचारी, दलाल आणि एजंट अत्यंत उर्मटपणे वागत होते. परिणामी वासनकर पीडितांचा आक्रोश सारखा वाढतच चालला होता. गुन्हे दाखल करून अडीच महिने झाले तरी पोलीस वासनकर आणि अन्य आरोपींना अटक करण्याची तसदी घेत नसल्यामुळे सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. लोकमतने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. लोकमतमध्ये ठळकपणे वासनकर समूहाच्या घोटाळ्यांचे आणि पीडितांच्या आक्रोशाचे तसेच पोलिसांच्या अनास्थेचेही वृत्त प्रकाशित होत होते. आजही लोकमतने वासनकरच्या कर्मचाऱ्यांच्या भाईगिरीचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले. त्याची पोलीस आयुक्त के. के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना यांनी गांभीर्याने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, गुन्हेशाखेचे उपायुक्त सुनील कोल्हे यांनी वासनकर प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, आज दुपारी २ च्या सुमारास गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धाने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वासनकरचे घर गाठले. प्रारंभी महाठग प्रशांत वासनकर, विनय वासनकर आणि अभिजित जयवंत चौधरी या तिघांना अटक केली. इतर आरोेपींनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.(प्रतिनिधी)
लोकमतचा दणका!
ठगबाज प्रशांत वासनकर यांनी केलेल्या घोटाळ्याची मालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. वासनकर, त्याचा भाऊ विनय आणि साळा अभिजित चौधरी या तिघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शहरातील आर्थिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अशा प्रकारे नागरिकांची रक्कम हडपून बसलेल्यांची धावपळही चर्चेला आली. उपराजधानीतील सर्वच स्तरातील शेकडो नागरिकांनी लोकमतमध्ये फोन करून ‘वासनकरला खरेच अटक झाली काय’, अशी विचारणा केली. होय, म्हणताच लोकमतच्याच दणक्यामुळे महाठग आणि त्याचे दोन साथीदार गजाआड झाल्याची भावनाही या सर्वांनी व्यक्त केल्या.

Web Title: Thugabab Wasanakar Ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.