धुळे महापालिकेत महिला सदस्यांचा ठिय्या
By admin | Published: June 29, 2017 01:47 AM2017-06-29T01:47:03+5:302017-06-29T01:47:03+5:30
तीन वर्षांपासून रखडलेला शहरातील कचरा संकलनाचा विषय बुधवारी स्थायी समितीच्या सभेत टिप्पणीत त्रुटी काढून पुन्हा तहकूब करण्यात आला़
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : तीन वर्षांपासून रखडलेला शहरातील कचरा संकलनाचा विषय बुधवारी स्थायी समितीच्या सभेत टिप्पणीत त्रुटी काढून पुन्हा तहकूब करण्यात आला़ त्यातच आरोग्य विभागाच्या प्रसूतिगृहात असलेल्या अस्वच्छता व असुविधांच्या निषेधार्थ महिला सदस्यांनी सभागृहातच ठाण मांडले होते़
मनपाच्या प्रसूतिगृहातील भंगार साहित्य व स्वच्छतेबाबत विचारणा करूनदेखील प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने संतप्त झालेल्या सदस्या मायादेवी परदेशी यांच्यासह सर्व महिला सदस्यांनी सभागृहातच ठिय्या मांडला़ अखेर सभापती व उपायुक्तांनी संबंधितांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात
आले.