तिकीट तपासनीसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला, अल्पवयीन युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 07:50 PM2017-08-22T19:50:21+5:302017-08-22T19:51:50+5:30
बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला.
डोंबिवली, दि. 22 - बांद्रा येथील एका उच्यभ्रू वसाहतीत राहणाऱ्या एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला.
वरिष्ठ तिकीट तपासनीस एल.डी.सावंत आणि सुनील सांबरे असे त्या दोघांचे नाव असून त्यांनी अल्पवयीन असल्याचे मंगळवारी निदर्शनास येताच अत्यत सावधपणे मुलीच्या पालकांशी सम्पर्क साधला. सावंत यांनी लोकमतला सांगितले की, एक मुलगी आणि एक मुलगा साधारण वय 15 वर्षे असेल, ते दोघे जण सकाळी कल्याण स्थानकात पुष्पक एक्स्प्रेसने जाण्यासाठी सावंत याना भेटले. त्यावर त्या दोघांनी त्या गाडीने यूपीला जायचे असून साध तिकिट कन्फर्म करून द्या असे सांगितले. त्यावर संशय येताच सावंत यांनी तातडीने सांबरे यांना घटना सांगितली. सांबरे यांनीही बांद्रा स्थानदरम्यान युवती मिसिंग असल्याची तक्रार असल्याचे सांगताच दोघांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सम्पर्क साधला. त्यावर मुलीचा फोटो मॅच होत असून पालकांना त्यासंदर्भात माहिती दिली. पालक सावंत यांच्याशी बोलले, घडला प्रकार समजून घेत ते दोघे पळून जात असल्याची माहिती पक्की झाली. त्यानुसार सावंत यांनी वेळकाढू पणा करत पुष्पक मध्ये जागा नसून दुसऱ्या गाडीत बसवतो थोडा वेळ द्या असे सांगितले. तसेच कल्याण स्थानकातील अरपीएफला माहिती दिली. काही वेळाने त्या मुलीचे पालक आले, त्यांनी ओळख पटवून दिल्यानंतर सावंत आणि सांबरे यांनी त्या युवतीला अरपीएफच्या सहाय्याने पालकांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे दोघा तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला. म्हणून मुलीच्या पालकांनी विशेष रक्कम बक्षीस म्हणून त्यांना देऊ केली असता सावंत यांनी ती नाकारली. मुलीचा सांभाळ नीट करा, मुलीचीही समजूत घालत असं पुन्हा करू नको असे समजावले. या घटनेमुळे सावंत आणि सांबरे यांचे मध्य रेल्वेच्या मुबंई विभागात कौतुक होत आहे.