वाघांच्या देशा

By admin | Published: January 21, 2015 02:20 AM2015-01-21T02:20:06+5:302015-01-21T02:20:06+5:30

सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले

Tiger country | वाघांच्या देशा

वाघांच्या देशा

Next

तीन वर्षांत संख्येत झाली ३० टक्के वाढ
नवी दिल्ली : सर्वसामान्य माणसांना भारतात कसेही दिवस येवोत, वाघांना मात्र ‘अच्छे दिन’ आल्याचे आज स्पष्ट झाले. २०१०च्या तुलनेत देशात तब्बल ३० टक्के वाघ वाढले असून त्यांची संख्या दोन हजार २२६वर पोहोचली आहे. देशातील वाघांची २०१४ची आकडेवारी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज जाहीर केली. जगभरात वाघांची संख्या घटत असताना भारताने मात्र यात वाढ नोंदविली आहे, हे विशेष.
२००६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ वर आल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि विविध पर्यावरणवादी संस्थांनी हातात हात घालून ‘वाघ वाचवा’ मोहीम हाती घेतली. २०१० साली या मोहिमेला यश आले आणि वाघांची संख्या १७०६वर पोहोचली. आता यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कर्नाटक नंबर वन!
कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळात वाघांच्या संख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यातही कर्नाटक नंबर वन आहे. या राज्यात तब्बल ४०६ वाघांची नोंद झाली आहे. उत्तराखंडमध्ये ३४० वाघांची नोंद झाली आहे. केरळात १३६, तर तामिळनाडूत २२९ वाघ नोंदविले गेले आहेत. २०१०साली कर्नाटकात ३०० वाघ होते. ओडिशा आणि झारखंडमध्ये मात्र वाघांची संख्या घटली आहे. ओडिशामध्ये २०१० साली ३२ वाघ होते, आज ही संख्या २८, तर झारखंडमधील संख्या दहावरून तीनवर आली आहे.
मेमध्ये आशियाई सिंहगणना
गुजरात सरकारतर्फे दर पाच वर्षांनी होणारी आशियाई सिंहगणना गीरच्या अभयारण्यात २ ते ५ मेच्या दरम्यान होणार आहे. मागील गणना २०१० मध्ये झाली होती. त्यावेळी ४११ सिंहांची मोजणी करण्यात आली होती.

च्जगभरातील ७० टक्के वाघ आता एकट्या भारतात असून वाघांचा उत्तम व्यवस्थापन करणारा देश म्हणून आपले नाव झाले असल्याची प्रतिक्रिया जावडेकर यांनी दिली.
च्या व्याघ्रगणनेसाठी देशभरात ९ हजार ७३५ कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. वाघबहुल १८ राज्यांत ३ लाख ७८ हजार ११८ चौरस किलोमीटर परिसर जंगलाने व्यापला आहे.
च्प्रेमात पडावी, अशी १५४० दुर्मिळ छायाचित्रे या गणनेदरम्यान मिळाली. वनकर्मचारी, सहभागी संस्था आणि सर्वांच्या पर्यावरणीय दृष्टिकोनामुळेच वाघांची संख्या वाढली आहे.

Web Title: Tiger country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.