ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 05:24 PM2019-12-19T17:24:52+5:302019-12-19T17:26:00+5:30

हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Tiger is enticing tourists with four chicks in Tadoba | ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ 

ताडोबातील वाघीण चार पिल्लांसह पर्यटकांना घालत आहे भुरळ 

googlenewsNext

- साईनाथ कुचनकार
चंद्रपूर -  वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबामध्ये मागील  दोन दिवसांपासून पर्यटकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. कोलार बफरमधील मदनापूर-पळसगावजवळ एक वाघीण आपल्या चार  बछड्यांसह जंगलात फिरताना पर्यटकांना दिसली. याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल  होत आहे.

हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा देशातच नाही, तर जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ताडोबातील भौगोलिक स्थिती वाघांसाठी पोषक असल्यामुळे मागील काही वर्षांमध्ये येथे वाघांचा जन्मदर वाढल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.  ताडोबातील कोअर झोन क्षेत्र वाघांसाठी कमी पडू लागले असून भक्ष्याच्या शोधात अनेकवेळा वाघ बफर क्षेत्रामध्ये फिरताना आढळतात. दोन दिवसांपूर्वीच ताडोबातील कोलार बफरमधील मदनापूर-पळसगावजवळ वाघीण आपल्या चार बछड्यांसह कोवळ्या उन्हामध्ये फिरत असल्याचे पर्यटकांना दिसली.  विशेष म्हणजे, धोका टाळण्यासाठी वनविभाग या बछड्यांकडे बारिक लक्ष ठेवून आहे. या बाघिणीसह तिच्या बछड्यांना बघण्यासाटी  या क्षेत्राच जाणाºया पर्यटकांची संख्या सध्या वाढली आहे.
 
वाघाची दहशत
मागील काही दिवसांपासून वाघांची संख्या वाढल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची दहशत आहे.  दोन दिवसापूर्वी चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या पात्रामध्ये वाघाचे दर्शन झाल्याने वनविभागासह जिल्हा प्रशासन जागे झाले. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे. शहरानजिक वाघाचा संचार वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Tiger is enticing tourists with four chicks in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.