‘बिग बी’च्या उपस्थितीत व्याघ्र संदेश रॅलीला प्रारंभ

By admin | Published: October 25, 2015 01:47 AM2015-10-25T01:47:26+5:302015-10-25T01:47:26+5:30

वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे व्याघ्रदूत

Tiger message rally starts in presence of 'Big B' | ‘बिग बी’च्या उपस्थितीत व्याघ्र संदेश रॅलीला प्रारंभ

‘बिग बी’च्या उपस्थितीत व्याघ्र संदेश रॅलीला प्रारंभ

Next

मुंबई : वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.
‘बिग बी’ अमिताभ यांच्या जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून सकाळी सातला या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. ‘अलायन्स रायडिंग नाईट्स’ या संस्थेतर्फे मुंबई-ठाण्याहून २० दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
अन्न साखळीतील वाघाचे महत्त्व, वाघाविषयी सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची माहिती देत, व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचिवण्याचे काम या रॅलीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
या रॅलीत राजीव तेलंग, हर्षिनी कान्हेकर, प्रणिश उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, व्हिक्टर पॉल, ओमयार वाच्छाा, श्रीराम गोपालकृष्णन, शार्दूल चामलाटे, शहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितू गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकूर, दीपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी. आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Tiger message rally starts in presence of 'Big B'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.