ताडोबा, मेळघाटात व्याघ्र संरक्षण दल!
By admin | Published: August 29, 2015 02:06 AM2015-08-29T02:06:48+5:302015-08-29T02:06:48+5:30
वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट
- गणेश वासनिक, अमरावती
वाघांच्या संरक्षणासाठी विदर्भातील पाचही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संरक्षण दल (टायगर प्रोटेक्शन फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांत असे दल गठित करण्यात आले आहे. प्रारंभी पाच वर्षे या संरक्षण दलावर केंद्राचे नियंत्रण राहणार असून, त्यानंतर राज्य शासनावर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात
आली आहे.
मेळघाट व ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना तस्करांनी लक्ष्य केल्यानंतर केंद्र सरकारने स्वतंत्रपणे व्याघ्र संरक्षण दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांत संरक्षण दल गठित केले गेले.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात १२०, तर मेळघाटसाठी ८१ जवान या दलात दाखल करण्यात आले आहेत. आता पेंच, बोर व नवेगाव बांध अभयारण्यात व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया प्रस्तावित असल्याने ती लवकर पूर्ण केली जाणार आहे.
साहाय्यक वनसंरक्षक, पाच वनपालांच्या मार्गदर्शनात हे दल कार्यरत राहील. शिकार रोखणे, व्याघ्र
प्रकल्पांत वाघांना धोका असलेल्या
बाबी निदर्शनास येताच तसा
अहवाल वरिष्ठांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी या व्याघ्र संरक्षण दलावर सोपविण्यात आली आहे.
निमलष्करी दलाचा दर्जा
टायगर प्रोटेक्शन फोर्सला निमलष्करी दलाचा दर्जा बहाल
करण्यात आला आहे. अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांच्या संरक्षणाबाबत काही धोकादायक बाबी आढळल्यास या दलातील जवानांना थेट फायरिंग करण्याचे विशेष अधिकारदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
या दलाच्या जवानांकडे एसएलआर रायफल, वरिष्ठांना रिव्हॉल्व्हर, वाहन, राहण्याची व्यवस्थाही करण्यात आली
आहे. व्याघ्र संरक्षण दल स्थापन
करण्याची फार पूर्वीची मागणी आहे. उशिरा का होईना, हे दल स्थापन झाल्याने विदर्भातील वाघांना संरक्षण मिळणार आहे. या दलाकडे वाघांच्या संरक्षणाची
जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मेळघाटचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार
त्यागी यांनी
सांगितले.
या दलाला तरी कालबाह्य प्रशिक्षण नको
व्याघ्र संरक्षण दल हे केवळ वाघांच्या संरक्षणासाठी गठित करण्यात आले आहे. मात्र वनविभागात जुन्याच पद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची परंपरा असल्याने हे प्रशिक्षण व्याघ्र संरक्षण दलाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यास ते काहीच उपयोगी पडणार नाही. त्यामुळे या दलाला अत्याधुनिक शस्त्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.