गोवा, कर्नाटकाकडे वाघांचा मोर्चा !

By admin | Published: March 8, 2015 02:49 AM2015-03-08T02:49:29+5:302015-03-08T02:49:29+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी वनसंपदा असूनही शिकारीच्या वाढत्या प्रमाणामुळे वन्य प्राण्यांनी गोवा तसेच कर्नाटकाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

Tigers Front Goa, Karnataka | गोवा, कर्नाटकाकडे वाघांचा मोर्चा !

गोवा, कर्नाटकाकडे वाघांचा मोर्चा !

Next

सिंधुदुर्गात दोनच वाघ : महाराष्ट्रात २१, कर्नाटकात १०६ वाघ वाढले
अनंत जाधव - सावंतवाडी (जि़सिंधुदुर्ग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी वनसंपदा असूनही शिकारीच्या वाढत्या प्रमाणामुळे वन्य प्राण्यांनी गोवा तसेच कर्नाटकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. वन्य प्राण्यांच्या नव्या गणनेत सिंधुदुर्गातील वाघांची संख्या तीनवरून दोनवर आली आहे; तर गोव्यात प्रथमच पाच वाघ आढळून आले आहेत.
गेल्या दोन गणनांमध्ये तेथे एकही वाघ आढळला नव्हता. महाराष्ट्रातील वाघांची संख्या २१ ने तर कर्नाटकात १०६ ने वाढली आहे़ संपूर्ण देशात २००५ मध्ये वाघांची गणना करण्यात आली. यात सिंधुदुर्गमध्ये तीन वाघ होते. गोवा व कर्नाटकच्या सीमेवर दाट जंगल आहे. मात्र गोव्यात २००५ व २०१० च्या गणनेवेळी वाघच आढळून आला नव्हता. तर २०१० मध्ये सिंधुुदुर्गमध्ये वाघांची संख्या तीनच होती. या तुलनेत कर्नाटकात २००५ मध्ये २९०, तर २०१० साली ३०० इतकी वाघांची संख्या होती. प्रभावी जनजागृतीमुळे महाराष्ट्रात वाघांची संख्या २०१३च्या गणनेनुसार १९० वर गेली. हीच संख्या २००५ मध्ये १०३, तर २०१० साली १६९ एवढी होती. मात्र सिंधुदुर्गमध्ये वाघांची संख्या तीन, तर नव्या गणनेनुसार वाघाच्या संख्येत १ ने घट झाल्याचे दिसून आले. सिंधुदुर्गमध्ये वाघांच्या घटत्या संख्येला वाढती शिकारच कारणीभूत आहे.

Web Title: Tigers Front Goa, Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.