वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांत सुधारणा

By admin | Published: November 4, 2015 11:51 PM2015-11-04T23:51:33+5:302015-11-04T23:51:33+5:30

वाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे

Tigers, leopard cages improvements | वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांत सुधारणा

वाघ, बिबट्यांच्या पिंजऱ्यांत सुधारणा

Next

- गणेश वासनिक,  अमरावती
वाघ, बिबट्या व इतर वन्यपशूंना पकडून कैद करण्याच्या लोखंडी पिंजऱ्यांमध्ये बदल करण्याचे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार, हे पिंजरे अधिक मोठे करण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्प, वनविभागाला प्राप्त झाल्या आहेत.
अलीकडे बिबट्या, तसेच इतर वन्यपशूंचा नागरी वस्त्यांच्या आसपास वावर वाढला आहे. त्यामुळे त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करताना ‘एनटीसीए’ने विशिष्ट सूचना दिल्या आहेत. यापूर्वी वन्यपशू पकडण्यासाठी लावले जाणारे पिंजरे लोखंडाचे होते. नवीन नियमावलीनुसार वाघ, बिबट्यांना पकडण्यासाठी पोलादापासून बनविलेले पिंजरे अनिवार्य क रण्यात आले आहेत.
वाघ, बिबट्याला पिंजऱ्यात कैद करताना त्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा असावी, खेळती हवा, डोक्याला छत लागू नये, पिंजऱ्यातून वाहतूक होत असताना, लाकडावर फायबर किंवा काच बसवावी, विष्ठा गोळा करण्याची व्यवस्था असावी, छत मजबूत असावे, अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. वाघ अथवा बिबट्याला एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना वाहनांसोबत ‘व्हेटरनरी कौन्सिल आॅफ इंडिया’ या संस्थेचे नोंदणीकृत सदस्य असलेले पशूशल्य चिकित्सक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषत:, वाघांचे स्थलांतर हिवाळ्यात करण्याचे निर्देश आहेत.

असे तयार होतील पिंजरे
४० बाय ४० व ६ एमएम आकाराचे पिंजरे तयार करताना एमएस अँगल लावले जाणार आहेत. दरवाजे १२ एमएम वायसरने घट्ट बसविले जातील. खेळत्या हवेसाठी छतावर छिद्रे असतील. पिंजऱ्यात वाघ, बिबट्याचे मलमूत्र गोळा करण्यासाठी २५ एमएमची दोन पात्रे तयार केली जातील. आहार देण्यासाठी १०० बाय १०० एमएमचा दरवाजा असेल.

Web Title: Tigers, leopard cages improvements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.