तुकोबांच्या पादुका मढवणार चांदीने!
By admin | Published: December 17, 2015 12:45 AM2015-12-17T00:45:34+5:302015-12-17T00:45:34+5:30
श्रीविठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका व चबुतरा चांदीने मढविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र देहू येथील श्रीसंत
पंढरपूर : श्रीविठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका व चबुतरा चांदीने मढविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र देहू येथील श्रीसंत तुकाराम महाराज संस्थानने या संदर्भात श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस पत्र दिले आहे.
पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका आहेत. या पादुका व चबुतरा चांदीने मढविण्याचा केलेला संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी या संस्थानने श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडे केली आहे. या पादुका व चबुतरा चांदीने मढविण्यासाठी येणारा सर्व खर्च संत तुकाराम महाराज संस्थान भाविकांच्या सहाय्याने करणार आहे. आषाढी एकादशी पूर्वी हे काम पूर्ण करून ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिरे समितीकडे हस्तांतर करण्यात येईल, असे संस्थानने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पादुका व चबुतरा मढविण्याचे काम तज्ज्ञ कारागिरांकडून करून घेतले जाईल.
- रामभाऊ मोरे, माजी विश्वस्त, श्रीसंत तुकाराम महाराज संस्थान