शरद पवार यांना टिळक पुरस्कार
By Admin | Published: July 26, 2016 12:53 AM2016-07-26T00:53:13+5:302016-07-26T00:53:13+5:30
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिले जाणारे लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार यंदा माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे.
पुणे : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टतर्फे दिले जाणारे लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार यंदा माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. पवार यांनी देशाच्या कृषी क्षेत्राला दिलेले योगदान लक्षात घेऊन या वर्षीचा पुरस्कार त्यांना देणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे ३४वे वर्ष असून, कृषी क्षेत्राबरोबरच अन्य क्षेत्रातही पवार यांचे मोठे योगदान असल्याने ट्रस्टच्या विश्वस्तांनी सर्वमताने पवार यांच्या नावाची एकमताने निवड केल्याचे ते म्हणाले. १ आॅगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या ९६व्या पुण्यतिथीदिनी टिळक स्मारक मंदिरात पुरस्कार वितरण होणार आहे. (प्रतिनिधी)