बच्चू कडू यांच्या अर्जावर उत्तर देण्यास सरकारला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:36 AM2018-06-26T04:36:26+5:302018-06-26T04:36:30+5:30

चांदूरबाजार येथील मारहाण प्रकरणात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे

The time for the government to respond to the application of Chachu Kadu | बच्चू कडू यांच्या अर्जावर उत्तर देण्यास सरकारला वेळ

बच्चू कडू यांच्या अर्जावर उत्तर देण्यास सरकारला वेळ

Next

नागपूर : चांदूरबाजार येथील मारहाण प्रकरणात दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला यावर उत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ वाढवून दिला.
अर्जावर न्यायमूर्ती रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कडू यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करू नये असा अंतरिम आदेश न्यायालयाने यापूर्वीच दिला आहे. फिर्यादी गोपाल तिरमारे यांच्या तक्रारीवरून चांदूरबाजार पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी कडू यांच्यासह एकूण पाच आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यावर कडू यांचा आक्षेप आहे. एफआयआरनुसार, तिरमारे यांनी कडू यांच्याविरुद्ध आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याचा राग कडू यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना तिरमारे यांच्याविरुद्ध चिथावणी दिली. त्यातून आरोपींनी तिरमारे यांच्यावर त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड व इतर शस्त्रांनी हल्ला केला. ही घटना ७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती.

Web Title: The time for the government to respond to the application of Chachu Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.