अवकाळी मात्र अनपेक्षित नाही
By admin | Published: March 5, 2016 08:24 AM2016-03-05T08:24:56+5:302016-03-05T08:30:33+5:30
मार्च महिन्यात राज्यात होत असणा-या पावसाची सर्व स्तरावर चर्चा होत असली तरी हा पाऊस अनपेक्षित नाही.
Next
>मार्च महिन्यात राज्यात होत असणा-या पावसाची सर्व स्तरावर चर्चा होत असली तरी हा पाऊस अनपेक्षित नाही. मागील काही दिवसात हवामानात होत असणारे बदल लक्षात घेता अशाप्रकारे पाऊस येईल आणि हवामानात बदल होतील असे अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने 15 दिवस आधीपासूनच दिले होते. परंतु आपल्याकडे या उपायांचा गांभिर्याने विचार करण्यात न आल्याने आता होत असलेल्या नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मागील 3 ते 4 वर्षापासून मराठवाडा आणि विदर्भात अशाप्राकरचा अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वेळोवेळी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले आहे. मात्र असे असतानाही याबाबतची काळजी आपल्या शेतक-यांकडून घेतली न गेल्याने आताची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पुर्वसूचनांचा गांभिर्याने विचार होण्याची आवश्यकता होती.
आता राज्यात ठिकठिकाणी ठिकठिकाणी झालेली गारपीट, वीजांचा कडकडाट यांचे सर्व इशारे हवामान विभागाने वेळोवेळी दिलेले होते. त्यामुळे आताच्या परिस्थितीला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. आपल्याकडे अनेकदा नुकसानाची आकडेवारी जाहीर केली जाते मात्र हे नुकसान होणार नाही यासाठीच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
उत्तरेकडील गार वारे आणि दक्षिणोकडील उष्ण वारे यांचे वेगवेगळे प्रवाह असून ते आपापल्या दिशेने वाहतात, ते कधीच एकमेकांत मिसळत नाहीत. मात्र आता हे प्रवाह एकत्र आल्याने मार्च महिन्यात राज्याच्या विविध भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. आता उष्णकटीबंधिय प्रवाह (ट्रॉपिकल) आणि त्याच्या बाहेरील प्रवाह (नॉन ट्रॉपिकल) एकमेकांना भिडलेले असल्याने देशभरातील विविध राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आता राज्यात पडलेला पाऊस हा एकाचवेळी न होता तो टप्प्याटप्प्याने विविध भागात पडला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे नुकसान झाले असे आताच्या परिस्थितीत म्हणता येणार नाही. 2014 मध्ये गारपीटीमुळे अशाचप्रकारे मोठे नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी एकाचवेळी राज्यात सर्व ठिकाणी गारपीट झाल्याने नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले होते.
मार्च महिन्यात उन्हाळा चालू झाल्यावर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून पाऊस येण्याची शक्यता असते. त्यामुळे ही परिस्थिती फारशी वेगळी असल्याचे म्हणता येणार नाही. यासाठी सध्याची हवामानाची परिस्थिती समजावून घेऊन दूरगामी उपाययोजना करणो गरजेचे आहे. यासाठी आपण लागवड करत असलेली पीके दमदार असायला हवीत. पावसाची एखादी सर आल्यास पिकांचे असे नुकसान होणो नुकसानीचे आहे. यासाठी सशक्त आणि िसबळ पीकांच्या प्रजातींचे संशोधन आणि लागवड व्हायला हवी. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणा:या अडचणींवरील उपाययोजना शोधण्यावर भर द्यायला हवा. त्यामुळे अशा अडचणींचा सामना करणो सोपे जाईल.
- डॉ. रंजन केळकर (माजी महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग)
शब्दांकन - सायली जोशी