शेतक-यांवर आली काकडी फेकून देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2016 07:14 PM2016-08-27T19:14:20+5:302016-08-27T19:14:20+5:30

सद्यस्थितीत बाजारात कांदा, काकडी, टोमॅटोचे भाव अत्यल्प असल्याने शेतक-यांना ते बाजारात आणून विकण्यासही परवडत नाही

Time to throw cucumber on the farmers | शेतक-यांवर आली काकडी फेकून देण्याची वेळ

शेतक-यांवर आली काकडी फेकून देण्याची वेळ

googlenewsNext
>- ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 27 - सद्यस्थितीत बाजारात कांदा, काकडी, टोमॅटोचे भाव अत्यल्प असल्याने शेतक-यांना ते बाजारात आणून विकण्यासही परवडत नाही. २७ ऑगस्ट रोजी एका शेतक-याने बंडी भर काकडी विक्रीस आणली पण दिवसभर बसून १० रुपये किलो काकडी देवूनही ग्राहक फिरकले नाहीत. केवळ दिवसभरात १५० रुपयांची काकडी विकल्या गेली. अखेर काकडीची काढणाची मजुरी व येण्या जाण्याचा खर्चही निघत नसल्याने अखेर उर्वरित सर्व काकडी शेतकºयाने फेकून घरी निघून गेला. हीच परिस्थिती बाजारात कांदा व टोमॅटोची दिसून येत आहे. कांदा जास्त दिवस टिकत असल्याने तो सांभाळून ठेवल्या जात आहे परंतु टोमॅटोही दोन दिवसावर ठेवण्यात येत नसल्याने शेतकºयांना ते फेकून देण्याची वेळ आली आहे. आधिच संकटात सापडलेल्या शेतकºयांवरची संकटाची मालिका टळता टळत नसल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Time to throw cucumber on the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.