काकडी पाठोपाठ शेतक-यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ

By admin | Published: August 31, 2016 02:25 PM2016-08-31T14:25:38+5:302016-08-31T14:25:38+5:30

योग्य भाव न मिळाल्याने वाशिममधील शेतक-यांनी चक्क टोमॅटो रस्त्यावर फेकू न दिली.

The time for throwing tomato on farmers after the cucumber | काकडी पाठोपाठ शेतक-यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ

काकडी पाठोपाठ शेतक-यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ

Next
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. ३१ -  उत्पन्न वाढले की, शेतक-यांचा मालाचा भाव घसरतो यामुळे शेतक-यांना करावे तरी काय असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. एक रुपया किलोनेही कोणी काकडी विकत घेत नाही म्हणून शेतक-यांनी चक्क काकडी रस्त्यावर फेकून घरी निघून गेल्याची घटना ताजी असतानाच त्या पाठोपाठ शेतक-यांना टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे.
वाशिम शहरासह ईतरही शहरामध्ये टोमॅटो ५  रुपये किलोने विक्री करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. या संदर्भात एका शेतकºयाशी संपर्क केला असता आवक मोठया प्रमाणात वाढली असल्याने व आडतमध्ये १० ते १५ रुपयामध्ये कॅरेट मागितल्या जात असल्याने ही पाळी शेतक-यांवर आली असल्याचे सांगितले. आडतमध्ये टोमॅटोचे एक कॅरेट ज्यामध्ये १५ ते १६ किलो टोमॅटो असतात ते १० ते १५ रुपयांमध्ये मागीतल्या जात असल्याने काढणी खर्च व येण्याजाण्याचा खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकºयांनी स्वता बाजारात टोमॅटो विक्रीस सुरुवात केली. त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकºयांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे. शेतकºयांवरील संकटे एकामागून एक सुरुच असल्याने त्यांच्या समोर जीवन कसे जगावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The time for throwing tomato on farmers after the cucumber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.