वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2016 01:20 AM2016-11-05T01:20:54+5:302016-11-05T01:20:54+5:30

मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे.

Time is very terrible, it does not forgive anyone | वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

Next


पुणे- मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे. खूप सुंदर आहे. परंतु भगवान महवीर असे म्हणतात, तुम्ही ज्या शरीराला सुंदर आणि मजबूत समजता ते अतिशय कमजोर आहे. एवढ्या मोठ्या शरीराला एक डास चावला की आपण तळमळत उठतो. पायामध्ये छोटासा काटा जरी टोचला तरी वेदनेने आपण घायाळ होतो. तर मग आपण कोणत्या गोष्टीसाठी या शरीराबद्दल अभिमान बाळगतो. एक छोटीशी लाल मुंगी संपूर्ण शरीराला हालवून टाकते. मग आपण या देहावर अभिमान करू नये. जे जीवन जे मिळाले आहे त्याचा क्षणमात्र भरवसा नाही. आता आपण बसलेलो आहोत आणि पुढच्या क्षणी आपेल अस्तित्व असेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून परमात्मा असे म्हणतात, की हे देहरूपी शरीर दुर्बल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ अतिशय भयंकर आहे. वेळेची मार कधी कशी पडेल हे सांगता येत नाही. वेळेपुढे रथी-महारथी टिकू शकले नाहीत. तर मग आम्ही अभिमानी का असावे? जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आपल्याला सहाय्य करणारे कोणी नसते. जेव्हा आपले हातपाय थकतील, शरीर वृद्धापकाळाने क्षीण होईल तेव्हा आपली सेवा करणारे मिळणे खूप कठीण आहे. ज्या कुटुंबावर आपल्याला खूप अभिमान असतो ते सुद्धा साथ देत नाहीत. मग आपण कोणासाठी व कशासाठी एवढा अभिमान बाळगून असतो. या भूतलावर बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांना असे वाटते की आमच्याजवळ पैसा आहे. तर आमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. परंतु परमात्मा असे म्हणतात, की खुपशा अशा समस्या आहेत की ज्या धनाने मिटू शकत नाहीत. जर एखादे असे आजारपण आले की कितीही पैसा खर्च केला तरी तो आजार बरा होऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याने मनुष्याचा अभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे. गंध, रुप, स्पर्श, वर्ण आदी गोष्टी मनुष्याला लगेचच आकर्षित करतात आणि मनुष्य त्याच्याकडे जलद गतीने आकर्षित होतो आणि फसतो. एखादे गाणे वाजू लागले की आपण त्याकडे आकर्षित होतो किंवा चांगला सुंगध आला तरी आपले लक्ष विचलित होते. जिथे आपल्याला सूट (डिस्काऊंट) दिसेल त्याकडे आपण लगेच धावतो आणि आपली फसवणूक होते. मनुष्य असा विचार करतो की समोरचा आपल्या एका गोष्टीवर दुसरी गोष्ट फुकट देत आहे परंतु हे खरे नसते. तर समोरची त्याच किंमतीत दोन्ही वस्तूंच्या पैशांची वसुली करत असतो. अशा मोहात अडकणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणेच होय.
- प. पू. डॉ. समकित मुनीजी म. सा.

Web Title: Time is very terrible, it does not forgive anyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.