संकटकाळात महाराष्ट्र जवानांच्या पाठीशी- मुख्यमंत्री ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 03:23 AM2020-06-20T03:23:03+5:302020-06-20T03:23:19+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या अशा समयी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु राहावी.
मुंबई : आम्ही मजबूर नाही आहोत तर मजबूत आहोत, हा संदेश आपण चीनला दिला पाहिजे. महाराष्ट्र सरकार हे अशा संकटसमयी आपल्या व सीमेवरील जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांना धन्यवाद देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, या अशा समयी आपण जो संवाद साधला आहे ही प्रक्रिया अशीच सुरु राहावी. आम्ही आमच्याकडून या प्रश्नी आवश्यक ते सर्व सहकार्य निश्चितपणे करू. मुख्यमंत्री म्हणाले की,असा गैरसमज जाणीवपूर्वक पसरविण्यात आला आहे की भारत हा चीनपेक्षा कमजोर आहे ही आता जुनी गोष्ट झाली. आमच्याकडेही सगळ्या शक्ती आहेत. पण आपण कुणावर हल्ले करण्यास उतावीळ नाही. आमचा भर नेहमी मुत्सद्देगिरी आणि संवादावर राहील पण याचा गैरफायदा कुणी घेणार असेल तर आपण आपली ताकद दाखवून दिली पाहिजे.