धुळ्यातील टीपू सुल्तानचे स्मारक हटविले; नितेश राणेंनी मानले फडणवीसांचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:57 AM2023-06-10T09:57:26+5:302023-06-10T09:58:05+5:30
काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता.
शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील टिपू सुलतान यांचे स्मारक अखेर शुक्रवारी पहाटे ठेकेदारानेच हटविले. यामध्ये प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून आमचा केवळ शेडो वाॅच होता. शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील टिपू सुलतान यांचे स्मारक प्रशासनाकडून हटविण्यात आले नाही. ज्या ठेकेदाराने ते स्मारक बांधले होते. त्यांनीच शुक्रवारी पहाटे ते स्मारक हटविले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. एआयएमआयएमचे आमदार फारूक अन्वर शाह यांनी धुळ्यातील एका चौकात टीपू सुल्तानचे स्मारक उभारल्याची तक्रार भाजयुमोने केली होती. यानंतर हे स्मारक हटविण्यात आले आहे.
भाजपाच्या युवा मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिली होती. याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, धुळे पालिकेलाही पत्र लिहून हे स्मारक हटविण्याची मागणी करण्यात आली होती. याची तक्रार प्राप्त झाल्यावर अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले होते.
काही दिवसांपूर्वी औरंगजेब आणि टीपू सुल्तानचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात वातावरण तापलेले होते. यावर फडणवीस यांनी अशा प्रवृत्तींना खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला होता. धुळ्यातील १०० फुटी रोडवर या स्मारकाचे बांधकाम करण्यात आले होते. ते पाडण्यात आल्याबद्दल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis जी
— nitesh rane (@NiteshNRane) June 9, 2023
जय श्री राम 🚩🚩 pic.twitter.com/MzMTIE2a4Y
प्रशासनाने आमदार शाह यांच्यासोबत चर्चा करून हे प्रकरण मिटविले आहे. या पार्श्वभूमीवर धुळ्यात सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.