कीर्तन करायचं की शेती, हा ज्याचा त्याचा प्रश्न : तृप्ती देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:16 PM2020-02-16T12:16:31+5:302020-02-16T12:18:19+5:30
शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे.
मुंबई : गर्भलिंगनिदान कसे करावे? याबाबत प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून भाष्य करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराजांना बुधवारी लेखी खुलासा करण्याबाबत नोटीसही बजावली होती. त्यामुळे आता खूप झाले आता डोक्यावरील फेटा उतरवून शेती करतो, असे विधान इंदोरीकर यांनी केले होते.
तर इंदोरीकर यांच्या विधानावर भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली असून, आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असल्याचे म्हंटल आहे.
मात्र शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे. त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीकाही यावेळी देसाई यांनी केली आहे.