बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 09:42 PM2018-10-09T21:42:27+5:302018-10-09T21:44:12+5:30

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़

'Titli' hurricane in the Bay of Bengal | बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात ‘टिटली’ चक्रीवादळ

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे टिटली चक्रीवादळात रुपांतर झाले असून त्याचा मोठा फटका उत्तर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसण्याची शक्यता आहे़. जमिनीवर आल्यावर ते ईशान्यकडे जाण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र तसेच मध्य भारतात त्यामुळे पाऊस होण्याची शक्यता नाही़. राज्यात पुढील दोन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. 
राज्यात सर्वाधिक जास्त कमाल तापमान अकोला येथे ३७़७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. 
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी सकाळी चक्रीवादळात रुपांतर झाले असून सध्या ते ओडिशातील गोपाळपूर येथून ५३० किमी आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापट्टणम येथून ४८० किमी दूर आहे़. हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि कलिंगापट्टणम दरम्यानच्या किनारपट्टीवर ११ आॅक्टोंबरला धडकण्याची शक्यता आहे़. यावेळी वाºयाचा वेग ताशी १०० किमी इतका असू शकतो़. यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर १० व ११ आॅक्टोंबरला अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे़. तसेच ११ व १२ आॅक्टोंबरला पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, मेझोराम, त्रिपुरा येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़. १२ आॅक्टोंबरला कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़. 

Web Title: 'Titli' hurricane in the Bay of Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.