ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:19 PM2021-06-22T16:19:03+5:302021-06-22T16:19:56+5:30

दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक यामध्ये सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महापालिकेने ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळले असल्याची माहिती समोर आली आहे.

tmc closed global tender process for corona vaccination due to no response | ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

ठाणे: स्पर्धक येत नसल्याने ग्लोबल टेंडर अखेर बासनात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने देखील पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडरची प्रक्रिया सुरु केली होती. परंतु दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकही स्पर्धक यामध्ये सहभागी न झाल्याने अखेर ठाणे महापालिकेने ग्लोबल टेंडर बासणात गुंडाळले असल्याची माहिती समोर आली आहे.  

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच लाख लसींसाठी ५० कोंटीचे ग्लोबल टेंडर काढण्याचा प्रक्रिया सुरु केली होती. त्यासाठी ८ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. पालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविले आहे. २६ मे पासून ही निविदा बोली लावण्यासाठी खुली करण्यात आली होती. त्यानुसार यासाठी ८ जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुंबई महापालिके प्रमाणो ठाणोकरांना लस मिळावी या उद्देशाने जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने देखील ग्लोबल टेंडर काढावे, असे आदेश दिले होते. 

त्यानुसार ठाणे महापालिकेने हे टेंडर काढले. त्यानुसार उत्पादन क्षमता त्यांनाच यात सहभागी होता येईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्याअनुषंगाने कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक या लसींचे उत्पादक, त्यांचे भारतातील भागिदार, पुरवठादार, वितरक यांनाच हे देकार भरता येण्यासारखे होते. तसेच लसपुरवठ्याचा अनुभव असलेल्या कंपन्या आणि वितरकांनाच देकार भरता येणार होते, स्वारस्य देकार सादर झाल्यानंतर पालिकेची निविदा कमिटी तांत्रिक आघाड्यांवर त्यांची तपासणी करणार, सर्व अटी - शर्तीची पुर्तता करणाऱ्या निविदाकारांचे आर्थिक देकार उघडले जाऊन, त्यात कमी बोली लावणाऱ्या, तसेच कमीत कमी वेळेत लसपुरवठ्याची तयारी दाखविणाऱ्या उत्पादन किंवा वितरकांची निवड केली जाणार होती.

परंतु आता पालिकेने काढलेल्या या निविदेला एकही स्पर्धक आला नाही. त्यामुळे पालिकेने पुन्हा याला दोन वेळा मुदतवाढ दिली होती. परंतु तरी देखील एकही स्पर्धक न आल्याने अखेर ठाणे  महापालिकेने ही निविदा प्रक्रियाच रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
 
ग्लोबल टेंडरला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु त्याला एकही स्पर्धक आलेला नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. - गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा
 

Web Title: tmc closed global tender process for corona vaccination due to no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.