पाणीसाठ्यात २४ तासांत एक टीएमसीने वाढ
By admin | Published: August 3, 2016 12:36 AM2016-08-03T00:36:37+5:302016-08-03T00:36:37+5:30
खडकवासला धरणसाखळीमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.
पुणे : खडकवासला धरणसाखळीमध्ये गेल्या २४ तासांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे एका रात्रीत तब्बल एक टीएमसी पाणीसाठ्याची वाढ झाली असून, पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणाचा पाणीसाठा साडेअठरा टीएमसीवर पोहोचला आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक ८८ मिमी पावसाची नोंद टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर पानशेत धरण ७३
टक्के भरले असून, वरसगाव धरण ६0 टक्के, तर टेमघर धरण ४९ टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून या चारही धरणांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केलेले
आहे. पावसाचा हा जोर वाढत असल्याने पाणीसाठ्यात चांगली वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर सायंकाळी पाचनंतर या चारही धरणांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने हा पाणीसाठा आणखी एक टीएमसीने वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना तसेच सिंचनासाठी कालव्याद्वारे ११५५ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून, पावसाचे प्रमाण जास्त राहिल्यास हा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच वरसगाव आणि पानशेत ही प्रमुख धरणे वेगाने भरत असल्याने पुढील वर्षी पाणीकपातीचा सामना करावा लागणारा असल्याचेही सांगण्यात आले.
>गेल्या २४ तासांतील पाणीसाठा
धरणाचे नावपाणीसाठा
खडकवासला१.२९
पानशेत७.८९
वरसगाव७.६२
टेमघर१.८0
एकूण१८.५0