कोयना-चांदोली धरणातून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी !

By Admin | Published: April 21, 2016 03:24 AM2016-04-21T03:24:06+5:302016-04-21T03:24:06+5:30

कर्नाटकात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कोयना व वारणा (चांदोली) धरणांतून एक टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

A TMC water for Karnataka from the Koyna-Chandoli dam | कोयना-चांदोली धरणातून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी !

कोयना-चांदोली धरणातून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी !

googlenewsNext

मिरज : कर्नाटकात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कोयना व वारणा (चांदोली) धरणांतून एक टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या चार दिवसांत कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार असून याबाबत चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे बुधवारी बैठक झाली.
कर्नाटक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व पुणे पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांची गुरुवारी सांगलीत बैठक होणार
आहे.
शिरोळ येथील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र गेले दोन महिने कोरडे पडले आहे. नदीपात्रात खडखडाट असल्याने कर्नाटकातील उगार, कुडची, अंकलीपासून हिप्परगी धरणापर्यंत नदीकाठच्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नदीकाठावरील गावांतील नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. जमखंडीजवळ हिप्परगी धरणातील पाणीसाठाही संपला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने फेब्रुवारीपासून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परंतु राज्य शासनाने एक टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. त्याबदल्यात कर्नाटकातील सिंचन योजनेतून जत व अक्कलकोट येथे कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
चिक्कोडी येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक होऊन, पाण्याच्या देवाण-घेवाणीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.
वारणा, कोयना, धोम, उरमोडी, बलवडी या धरणांतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र कर्नाटकातील बंधाऱ्यात अपुरे पाणी असल्याने, सोडलेले पाणी राजापूर बंधाऱ्यापासून अथणीपर्यंत सुमारे ६० किलोमीटर पोहोचण्यासाठी प्रतिसेकंद एक हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडावे लागणार
आहे.
यासंदर्भातील आराखडा गुरुवारच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (वार्ताहर)

Web Title: A TMC water for Karnataka from the Koyna-Chandoli dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.