कारागृहातील अति गर्दी टाळण्यासाठी बंद्यांना खुल्या कारागृहात करणार वर्ग  

By मनीषा म्हात्रे | Published: March 2, 2023 03:14 PM2023-03-02T15:14:51+5:302023-03-02T15:15:38+5:30

Maharashtra News: कारागृहातील अति गर्दी टाळणेसाठी खुले कारागृहासाठी पात्र शिक्षा बंद्यांना खुले कारागृहाच्या क्षमतेपेक्षा 20 % जादा  बंद्यांना खुले कारागृहात वर्ग करण्यात येईल. 

To avoid overcrowding in prisons, classes will be held in open prisons | कारागृहातील अति गर्दी टाळण्यासाठी बंद्यांना खुल्या कारागृहात करणार वर्ग  

कारागृहातील अति गर्दी टाळण्यासाठी बंद्यांना खुल्या कारागृहात करणार वर्ग  

googlenewsNext

कारागृहातील अति गर्दी टाळणेसाठी खुले कारागृहासाठी पात्र शिक्षा बंद्यांना खुले कारागृहाच्या क्षमतेपेक्षा 20 % जादा  बंद्यांना खुले कारागृहात वर्ग करण्यात येईल.  संघटित गुन्हेगारी/देशविघातक कारवाया/दहशतवादी कारवाया/नक्षलवादी /NDPS (अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा ) बलात्कारी गुन्हे/व्यावसायिक खुनी व इतर अतिगंभीर गुन्ह्यातील बंदी वगळता 1 वर्षावरील शिक्षा झालेल्या सर्व बंद्यांना निव्वळ 1 वर्ष किंवा जन्मठेपेच्या बाबतीत 5 वर्ष शिक्षा भोगल्यानंतर खुले कारागृहात वर्ग करण्यात येते . खुले कारागृहात बंद्याने एक महिना शिक्षा भोगल्यानंतर 30  दिवस सर्वसाधारण माफी देण्यात येत असते . बंद्यांची व नातेवाईकांची भेट प्रत्यक्ष समोरा समोर देण्यात येत असते. तसेच बंद्यांना खुले कारागृहाचे शेतीत ,कारखाना विभागात काम दिले जाते. बंदी मोकळ्या हवेत शिक्षा भोगत असल्याने त्यांचे जीवनमान सुधारते.

सध्या राज्यात 19 खुले कारागृह असून 1512 पुरुष व 100 महिला बंदी क्षमता आहे. सन 2022 मध्ये खुले कारागृहासाठी पात्र असलेल्या 1571 पुरुष  बंदी व 45 महिला बंदींना खुले कारागृहासाठी पात्र करण्यात आले होते. परंतू सर्वच खुले कारागृहात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने बरेच बंदी खुले कारागृहात जावू शकले नाहीत. त्यामुळे मा. श्री अमिताभ गुप्ता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा यांचे अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये खुले कारागृहाची बंदी क्षमता साधारणपणे 20 % ने वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच भादंवि 392 ते  402 कलमांमध्ये शिक्षा सुनावलेल्या बंद्यांची त्या  कलमातील शिक्षा संपल्यानंतर त्यांना खुले कारागृहासाठी पात्र करून इतर कलमातील उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी बंद्यांना खुले कारागृहात  वर्ग करण्यात यावे तसेच 60 वर्षे व त्यावरील वयस्कर बंद्यांना खुले कारागृहात वर्ग करावे असाही धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. या दोन्ही धोरणात्मक निर्णयामुळे बंद्यांना खुले कारागृहाचा लाभ मिळेल .

Web Title: To avoid overcrowding in prisons, classes will be held in open prisons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.