सरकारी रुग्णालयांमध्ये होणार तंबाखूमुक्ती केंद्र
By admin | Published: June 4, 2017 12:29 AM2017-06-04T00:29:15+5:302017-06-04T00:29:15+5:30
सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी केली होती. डॉ. रमाकांत देशपांडे
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारी रुग्णालयांमध्ये तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावीत, अशी मागणी तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने मुंबईतील काही डॉक्टरांनी केली होती. डॉ. रमाकांत देशपांडे यांनी या विषयीचा प्रस्ताव राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे सादर केला होता. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, डॉ. सावंत यांनी मान्यता दिली असून, या विषयी लवकरच बैठक घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे.
या विषयी अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी आणि तंबाखूच्या व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी
येत्या सहा महिन्यांमध्ये सरकारतर्फे व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करण्यात येतील. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात पहिल्यांदाच तंबाखू व्यसनमुक्ती केंद सुरू करण्यात येणार आहे. तंबाखूमुक्तीसाठी खासगी रुग्णालयातील हे अशा प्रकारचे पहिलेच केंद्र असेल.