तंबाखू खाल तर बडतर्फ व्हाल, भरतीवेळेस परिवहनमंत्र्यांचा इशारा
By admin | Published: November 2, 2015 02:57 AM2015-11-02T02:57:03+5:302015-11-02T02:57:03+5:30
तंबाखू खाणार तर बडतर्फीची कारवाई एसटीच्या कनिष्ठ चालकांवर केली जाईल, असा थेट इशारा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे.
मुंबई : तंबाखू खाणार तर बडतर्फीची कारवाई एसटीच्या कनिष्ठ चालकांवर केली जाईल, असा थेट इशारा परिवहनमंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिला आहे. तंबाखू किंवा पान खाऊन थुंकल्यामुळे एसटीच्या बस अस्वच्छ होत आहेत. यामध्ये एसटीच्या चालकांकडूनच अस्वच्छता पसरवली जात
असल्याने, भरतीतील नवीन कनिष्ठ चालकांना हा इशारा देण्यात
आला. या चालकांकडून एक प्रतिज्ञापत्रही लिहून घेण्यात
येणार असल्याची माहिती
देण्यात आली.
एसटीच्या बहुतांश चालकांकडून तंबाखू किंवा पान खाण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरोग्याबरोबरच एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो. बस चालवताना तंबाखू किंवा पान खाऊन थुंकल्यामुळे, बस गाड्या अस्वच्छ होत असल्याने नवीन चालकांकडून तंबाखू न खाण्याबाबत प्रत्यक्षात लिहून घेतले जात असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, दोन दिवसांपूर्वीच परिवहनमंत्र्यांसोबत एसटीच्या कामगार संघटनांची एसटीच्या मुंबईतील मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत तंबाखू खाणाऱ्या चालकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. याबाबत एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, चालकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि बस गाड्यांच्या स्वच्छतेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भरतीच्या वेळेसच
महामंडळाचा संदेश
एसटी महामंडळात ३६ हजार चालक असून, सध्याच्या चालकांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. हे पाहता एसटी महामंडळाकडून नवीन कनिष्ठ चालकांची भरती केली जात आहे. अशा ७ हजार ६३0 कनिष्ठ चालकांची भरतीप्रक्रिया पूर्ण होत असून, सध्या एसटीच्या पुण्यातील भोसरी येथील ट्रॅकवर वाहन चाचणी होत आहे. यात राज्यातील एसटीच्या दोन-तीन विभागांत काही चालक दाखलही झाले आहेत. मात्र, या चालकांकडून एसटी महामंडळाने तंबाखू न खाण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही प्रक्रिया पारही पाडली जात आहे.
कुंभमेळ््यादरम्यान वाहकांकडून पैसे हडप परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासोबत एसटीच्या युनियनची बैठक पार पडली. यात कुंभमेळ््यादरम्यान चालकांकडून तिकिटांच्या रक्कम हडप करण्यात आल्याचे बैठकीत सांगितले. असे जवळपास सहा वाहक आहेत, वाहकांकडून असे होता कामा नये. या वाहकांवर कारवाई होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे एसटीच्या बस गाड्या या अस्वच्छ होत आहेत. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच चालकांच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत.
- दिवाकर रावते
(परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष)