आज फटाके कुणाचे?

By admin | Published: October 19, 2014 02:54 AM2014-10-19T02:54:08+5:302014-10-19T02:54:08+5:30

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळे राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे.

Today the crackers? | आज फटाके कुणाचे?

आज फटाके कुणाचे?

Next
विधानसभा निकालाकडे लक्ष : सरकार कोणाचे, देशभरात उत्कंठा 
मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असल्यामुळे राज्यभर जोरदार आतषबाजी होणार आहे. मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे, हे अवघ्या काही तासांनंतर कळणार असल्यामुळे निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
रविवारी सकाळी 8 वाजेपासून 288 विधानसभा आणि बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 269 ठिकाणी मतमोजणीला प्रारंभ होणार असून, अवघ्या तासाभरात मतदारांचा कल समजू शकेल. दुपारी 3 वाजेर्पयत अंतिम निकाल हाती येतील, असे निवडणूक आयोगाने कळविले आहे. 13 व्या विधानसभेसाठी 15 ऑक्टोबर रोजी मोठय़ा उत्साहात मतदान झाले.  एकूण 8 कोटी 33 लाख 9क् हजार 396 मतदारांपैकी  5 कोटी 26 लाख 45 हजार 127 जणांनी (63.13 टक्के) मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र चुरशीच्या लढती झाल्यामुळे मतदानाचा टक्का लोकसभेपेक्षा 3.63 टक्क्यांनी वाढला. गेल्या 25 वर्षापासूनची शिवसेना-भाजपाची युती आणि राज्यात गेल्या 15 वर्षापासून सत्तेवर असलेली काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यामुळे सर्वच ठिकाणी चौरंगी, पंचरंगी सामने झाले. यामुळे उमेदवारांची संख्या चार हजारांवर पोहोचली. (विशेष प्रतिनिधी)
 
8 वाजल्यापासून मतमोजणी  
रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वत्र ईव्हीएमद्वारे मतदान झाले असल्याने वेगाने मतमोजणी होईल. सकाळी 1क् वाजेर्पयत निकालाचा कल स्पष्ट होईल.
 
तोंड बंद ठेवण्याचे शहांचे आदेश : पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले अन्य नेते हे मेट्रो लीडर आहेत, तर आपणच फक्त मास लीडर आहोत, 
असे विधान करून खळबळ उडवून दिली. तर विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 
कुणीही आघाडीवर नाही, असे सुचवल्याने भाजपातील तरुण तुर्काच्या या वक्तव्याची भाजपाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली. निकालार्पयत कुणीही 
मतप्रदर्शन करू नका, असा सक्त इशारा त्यांनी दिल्याचे समजते.  
 
पंकजाला सबुरीचा सल्ला : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराबद्दल शिवसेनेला प्रचंड आदर आहे. गोपीनाथ यांच्या पश्चात पंकजा या चांगले काम करीत आहेत. परंतु मुख्यमंत्रिपद ही सोपी गोष्ट नाही, असा सबुरीचा सल्ला शिवसेनेचे नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिला. 
 
बाबा मला आशीर्वाद द्या : बाबा मला आशीर्वाद द्या, मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. माङया आयुष्यात उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. मला यश मिळू देत़ बीडमधील सर्व सहा जागा मी जिंकेन, असा मला विश्वास आहे. असे पंकजा मुंडे यांनी टि¦टमध्ये म्हटले आहे.
 
शिवसेनेची भूमिका मवाळ : निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेने भाजपावर टीका केली असली तरी आता निकालानंतर भाजपाबरोबर सत्तेत सहभागी होण्याकरिता शिवसेनेने भूमिका मवाळ केली आहे. आता वाद नकोत व कटुताही नको, महाराष्ट्राला स्थैर्य व शांतता हवी, अशी भूमिका शिवसेनेने घेत भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. शिवसेनेने पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले होते. मात्र आता सेनेच्या मुखपत्रतील भूमिका मवाळ झाली असून प्रवक्ते सत्तेकरिता एकत्र येण्याचे संकेत देऊ लागले आहेत.
 
1 मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अनेक दिग्गजांची नावे सध्या चर्चेत आहेत. विशेषत: भाजपामध्ये तर जोरदार रस्सीखेच आहे. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपाला बहुमत मिळाले नाही आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्याची वेळ आली तर नितीन गडकरी यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो.  
2शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले किंवा 13क् च्या आसपास जागा प्राप्त झाल्या, तरच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घेतील. मात्र त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिवसेना सत्तास्थापनेकरिता प्रयत्न करील. त्यासाठी मुख्यमंत्रिपदाकरिता सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम यांची नावे चर्चेत आहेत. 
3काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तर समविचारी पक्षांशी आघाडी करून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. त्या स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे नारायण राणो, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, हर्षवर्धन पाटील अथवा सुशीलकुमार शिंदे यांचा विचार होऊ शकतो.
4राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली, तर या पक्षाकडून अजित पवार यांच्याशिवाय दुसरे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही.
 
एक्ङिाट पोल खरे ठरणार का? 
विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमताचा (144) आकडा गाठता येणार नाही, मात्र भाजपाला सर्वाधिक 11क् ते 14क् जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले आहे. तर शिवसेना दुस:या क्रमांकावर राहील, असा दावा शिवसेनेचे नेते 
करीत आहेत. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता आहे. 
 
मंत्रिपदासाठी होणार रस्सीखेच
समजा, भाजपाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळालीच तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि रिपाइंचे नेते मंत्रिपदासाठी अडून बसण्याची शक्यता आहे. जागावाटपातही या पक्षांनी  नाकदु:या काढण्याची वेळ आणली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वादाचे प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे.
 
राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक?
सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असेल, असा दावा पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला असल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष असेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही, असे भाजपा नेत्यांचे म्हणणो असले तरी राजकारणात काहीही घडू शकते, हे खरेच!

 

Web Title: Today the crackers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.